मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 18 मे 2021 (20:45 IST)

प्लेटलेट्स वाढविण्याचे 5 फायदेशीर उपाय

निरोगी शरीराचे लक्षण म्हणजे शरीरात प्लेटलेट्सचे योग्य प्रमाणात असणे आणि त्यांनी योग्यरित्या कार्य करणे. परंतु प्लेटलेटच्या कमतरतेमुळे आपल्या शरीराला आणि आरोग्याला त्रास सहन करावा लागतो. आपल्या आहारातून आपण प्लेटलेट्सची संख्या सहज वाढवू शकतो. जाणून घ्या -
 
1 प्रथिने, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के,फोलेट, झिंक, फॉलिक ऍसिड, सेलेनियम इत्यादी पौष्टिक घटकांनी समृद्ध आहार घेतल्यास प्लेटलेट्स वाढविण्यावर प्रभावी उपाय सिद्ध होईल.
 
2 आपल्या आहारात दही, आवळा, लसूण, ग्रीन टी तसेच नारळाचे पाणी आणि डाळिंब, पपई, सफरचंद, बीटरुट यासारखे फळ तसेच पपईच्या पानांचा रस पिणे देखील एक फायदेशीर उपाय आहे.
 
3 दररोज कोरफडचे सेवन करणे देखील फायदेशीर आहे. दररोज 20 ते 25 ग्रॅम कोरफडाचे गर खावे किंवा त्याचा रस बनवून प्यावे .
 
 
4 प्लेटलेट्स वाढविण्यात ज्वारी खूप उपयुक्त आहे. दररोज सकाळी अनोश्या पोटी ज्वारीचा रस पिल्याने प्लेटलेट्सची संख्या हळूहळू वाढेल.
 
5 गिलोयचा वापर देखील या साठी रामबाण उपाय आहे.गिलोय ला तुळशीसह पाण्यात उकळवून घ्या आणि काढा तयार करा. हा काढा दररोज वापर केल्यास फायदा होईल.