सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 18 मे 2021 (17:47 IST)

व्यायाम न करता वजन कमी करण्यासाठी 10 प्रभावी टिप्स

वजन कमी करायचे आहे आणि व्यायाम देखील करायचा नाही? काळजी करू नका. आमच्या कडे आपल्यासाठी अशा 10 टिप्स आहेत ज्यांना अवलंबविल्याने कोणतेही व्यायाम न करता आपले वजन कमी होऊ शकेल. चला तर मग काय आहे त्या  टिप्स जाणून घेऊ या.
 
1 सक्रिय राहा- इथे सक्रिय राहण्याचा अर्थ व्यायाम करण्यासाठीचा नाही,तर प्रत्येक कामात सक्रियरित्या भाग घेणे आहे. या मुळे रक्त विसरणं देखील चांगले होईल. तसेच शरीराचा हलका व्यायाम देखील होईल.
 
2 फॅटी फूड - पिझ्झा,पास्ता, चीज, बर्गर यासारख्या गोष्टी खाणे टाळावे कारण यामुळे आपले वजन एका दिवसात असंतुलित होते. हे पदार्थ धान्यापासून बनवलेल्या पदार्थांपेक्षा जास्त चरबीयुक्त असतात. वजन कमी करणे सोपे नाही जर हे पदार्थ खाण्याचा मोह आवरला नाही तर हे लक्षात ठेवा की वजन कमी करणे सोपे नाही.
 
3 पाणी -दिवसभरात दर तासाला मर्यादित प्रमाणात पाणी प्या. जेवण करण्यापूर्वी आणि जेवल्या नंतर कमी प्रमाणात पाणी प्या. हे चयापचय प्रक्रिया व्यवस्थित करेल.
 
4 भुकेपेक्षा कमी खा-एकाच वेळी जास्त खाऊ नका तर भूक लागल्यापेक्षा थोडे कमीच खावे जेणेकरून पचन व्यवस्थित होते आणि शरीरात चरबी जमा होत नाही. रात्रीच्या जेवणासाठी सॅलड, फळे किंवा द्रवपदार्थ घेण्यावर अधिक लक्ष द्या.
 
5 तुकड्यात खा- आपल्या एकूण आहाराला तीन ते चार वेळा थोड्या-थोड्या प्रमाणात घ्या. सकाळची न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाच्या दरम्यान,काहीतरी हलकं खात राहा. या मध्ये आपण फळे,सॅलड किंवा सूप देखील समाविष्ट करू शकता. 
  
6 रात्रीचे जेवण -रात्रीच्या जेवणात आणि झोपण्यात किमान दोन ते तीन तासाचा अंतर असावा,जेणे करून अन्न पचन करणे सोपे जाईल.या वेळात आपण घरातील लहान-लहान कामे करा किंवा पायी चाला, जेणे करून अन्न पचनाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे होईल. 
 
7 पुरेशी शांत झोप घ्या- झोपेची कमतरता आणि अधिक झोपणे हे दोन्ही हानिकारक असतात,आणि वजन ला अनियंत्रित करण्यात मदत करतात. शारीरिक क्रियाकलाप व्यवस्थितरित्या करण्यासाठी 6 ते 8 तासांची झोप घेणं आवश्यक आहे. झोप कमी झाल्याने तणाव वाढतो. अनेकदा तणाव देखील लठ्ठपणाला कारणीभूत असतं.  
 
8 प्रथिने आणि फायबर -आपल्या आहारात भरपूर प्रथिने आणि फायबर चे सेवन करा. या मुळे आपले पोट देखील जास्त काळ भरलेले राहील आणि आपण अतिरिक्त कॅलरी घेण्यापासून वाचाल.  या व्यतिरिक्त, फायबर आपल्याला ऊर्जा देईल जे सक्रिय राहण्यास मदत करेल आणि आपले वजन कमी होईल.
 
9 गरम पाणी -सकाळी अनोश्यापोटी गरम पाणी प्यायल्याने पोटाची चरबी कमी होईल.जेवल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने चरबी साचत  नाही आणि पचन क्रिया देखील चांगली होण्यास मदत करेल. या व्यतिरिक्त दिवसातून दोन ते तीन वेळा गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होते.
 
10 विश्रांती- आपल्याला खूप विश्रांती घेण्याची सवय असेल तर असं करणे  टाळा. कार्यालयात किंवा घरात तासन्तास एकाच  ठिकाणी बसू नका. यामुळे शरीराच्या खालच्या भागात चरबी जमा होऊ शकते आणि पोटावर देखील चरबी वाढू शकते. थोड्या-थोड्या वेळाने उठून फिरा .जेणेकरून शरीरात चरबी जमा होणार नाही.