शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 18 मे 2021 (17:06 IST)

मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोरोना किती धोकादायक आहे जाणून घ्या

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजूनही सुरू आहे. लसीकरण, मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि हात धुणे हे या आजाराला   टाळण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहेत. या नियमांचे सर्वांनी सतत अनुसरण केले पाहिजे.हा विषाणू लोकांपर्यंत कसा पोहोचत आहे, याची शास्त्रज्ञांनी पुष्टी केलेली नाही,यावर संशोधन चालू आहे. सामान्य लोक कोरोनामधून बरे होत आहेत परंतु मधुमेह रूग्णांसाठी हा आजार घातक आणि जीवघेणा ठरत आहे.
 
एखादा व्यक्ती कोरोनाने गंभीररीत्या बाधित होतो तेव्हा डॉक्टर त्याला स्टिरॉइड औषध देतात. या मध्ये साखरेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. रुग्णांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर हे औषध देतात. हे औषध पूर्णपणे बंद केले  जात नाही, औषधाचा डोस कमी करुन हे बंद केले जाते. या काळात मधुमेहाच्या रुग्णांना वेळच्या वेळी  साखर तपासणे आवश्यक असते.
 
मधुमेह रूग्णांमधील धोकादायक लक्षणे-
 
1 ब्लॅक फंगस संसर्ग होण्याचा धोका होणे.
2 न्यूमोनियाचा धोका होणे.
3  रोगप्रतिकारक यंत्रणा कमकुवत असणे. 
4 हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका होणे.
5 व्हेंटिलेटरची आवश्यकता होणे.
 
मधुमेह असलेल्या रुग्णांना ज्यांना कोरोना झालेला नाही त्यांनी या 5 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत-
 
1 आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका.
2 सकाळी किमान 40 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे.
3 दर तासाला 10 मिनिटे उभे रहा. तसेच, घरात देखील चालत फिरत रहा.
4 आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवा.
5 चेहरा आणि नाकाला स्पर्श कमी करा.