मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 18 मे 2021 (18:31 IST)

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचा आहार कसा असावा जाणून घ्या

हायपरटेन्शन ज्याला उच्च रक्तदाब किंवा हाय बीपी म्हणतात. या मध्ये रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब वाढतो. हे कोणत्याही वेळी शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतं. अशा वेळी आपल्या आहाराकडे लक्ष देण्याची गरज असते.चला जाणून घ्या उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचा आहार काय असावा - या 13 गोष्टी.
 
* उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी मीठाचे सेवन कमी करावे.
 
* उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी जास्त प्रमाणात अन्न खाऊ नये, तसेच गरिष्ठ अन्न घेणे टाळावे.
 
* दिवसातून किमान 10-12 ग्लास पाणी अवश्य प्यावे.
 
* बाजरी, गव्हाचे पीठ, ज्वारी, अख्खी मूग आणि अंकुरलेल्या  डाळी कमी प्रमाणात खावे.
 
* पालक, कोबी, बथुआ अशा हिरव्या पाले भाज्यांचे सेवन करावे.
 
* फळे आणि भाजीपाला जास्त प्रमाणात सेवन करावे.
 
* लसूण, कांदा, संपूर्ण धान्य, सोयाबीनचे सेवन केले पाहिजे.
 
* दुधी भोपळा, लिंबू, घोसाळ, पुदीना, परवल, शेवगा, लाल भोपळा, ढेमसे,कारले इत्यादी भाज्यांचे सेवन करावे.
 
* आहारामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असावे आणि सोडियमचे प्रमाण कमीअसावे.
 
* ओवा, मनुके आणि आल्याचं  सेवन केल्यास रुग्णाला फायदा होतो.
 
*मौसम्बी, द्राक्षे, डाळिंब, पपई, सफरचंद, संत्री, पेरू, अननस इत्यादी फळे खाऊ शकता.
 
* बदाम, साय नसलेले दूध, ताक, सोयाबीन तेल, गायीचे तूप, गूळ, साखर, मध, मोरोवळा इत्यादींचे सेवन करता येते. 
 
* डेयरी पदार्थ, साखर, रिफाईंडमध्ये तळलेले पदार्थ, कॅफिन आणि जंक फूडशी नाते ठेऊ नका.