कोथिंबीरीचे 10 फायदे जाणून घ्या
कोथिंबिरीचा वापर भाज्यांची चव वाढविण्यासाठी आणि सॅलड मध्ये केला जातो. कोथिंबिरीची चटणी कोणत्याही खाद्य पदार्थाची चव दुप्पट करते.याचे अनेक फायदे आहे चला जाणून घ्या.
* कोथिंबीरमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतात, जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करतात.
* उन्हाळा असो किंवा हिवाळा, कोथिंबीर वापरल्याने शरीराला बर्याच प्रकारे फायदा होतो.
* आपली पाचक शक्ती मजबूत ठेवू इच्छित असल्यास कोथिंबीर नियमितपणे वापरावी . यामुळे पाचक शक्ती वाढते.
* कोथिंबीरचा वापर केल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो आणि अपचन, पोटदुखी, गॅसच्या समस्यां पासून मुक्त होतो.
* हिवाळ्यात अन्नाचे प्रमाण जास्त वाढल्याने अतिसाराची तक्रार वाढू लागते. अशा वेळी कोथिंबीरची चटणी आणि कोशिंबीर पोटात आराम देते.
* कोथिंबीर व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चे मुख्य स्रोत आहेत. हे आपल्या शरीरात रोग प्रतिरोधक क्षमता बळकट करते.
* कोथिंबीरीचे नियमित सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
* कोथिंबिरीत असलेले घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करून त्यावर नियंत्रण ठेवते. ही रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करते.
* कोथिंबीर स्त्रियांमधील मासिक पाळीच्या समस्या दूर करते. पीरियड्स सामान्यपेक्षा जास्त असल्यास अर्ध्या लिटर पाण्यात सुमारे 6 ग्रॅम धणे घाला आणि उकळवा. या पाण्यात साखर घालून पिण्यास फायदा होईल.
* यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.