गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (09:00 IST)

भेंडीखाण्याचे फायदे जाणून घ्या

उन्हाळ्यातील भाजीमध्ये एक भेंडी आहे, जी सर्व भाज्यांमध्ये विशेष मानली जाते. बर्‍याच लोकांची ही पहिली पसंती आहे, तर बऱ्याच लोकांना भेंडी ही आवडत नाहीत आपण उन्हाळ्यात भेंडी खाल्ल्यास रोगप्रतिकार शक्ती चांगली होते, भेंडी खाल्ल्याने बहुतेक रोगांशी लढा देण्यास शरीराला सामर्थ्य मिळते आणि शरीर सहजपणे व्हायरल इन्फेक्शनशी लढू शकते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.
 
ही लेडी फिंगर म्हणून ओळखली जाते जी लहान मुलांना खूप आवडीची आहे. भेंडीचे 10 फायदे जाणून घ्या. 
 
1 पाचक प्रणाली - भेंडी फायबरने समृद्ध आहे. या मध्ये चिकट लसलसा फायबर हे पचन प्रणाली साठी फायदेशीर आहे. या मुळे पोटफुगी, बद्धकोष्ठता, वेदना आणि गॅस सारखे त्रास होत नाही. 
 
2 हृदय- भेंडी आपले हृदय देखील निरोगी ठेवते. त्यात उपस्थित पेक्टिन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, तसेच या मध्ये आढळणारे विरघळणारे फायबर, रक्तातील कोलेस्टेरॉलचे नियंत्रण करते ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
 
3 मधुमेह- भेंडीत आढळणारे युजेनॉल मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढण्यास रोखते आणि या मुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
 
4 अशक्तपणा- भेंडी अशक्तपणामध्ये देखील खूप फायदेशीर आहे. त्यात असलेले लोह हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करते आणि व्हिटॅमिन-के रक्तस्त्राव थांबविण्याचे कार्य करते.
 
5 डोळ्याची दृष्टी -भेंडीमध्ये व्हिटॅमिन-ए, बीटा-कॅरोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे सेल्युलर मेटाबोलिझमद्वारे निर्मित मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात. हे कण अंधत्व साठी कारणीभूत आहेत. याशिवाय भेंडी मोतीबिंदूपासूनही संरक्षण करते.
 
6 हाडे मजबूत बनवतात- भेंडीमध्ये आढळणारा चिकट पदार्थ आपल्या हाडांसाठी उपयुक्त आहे. या मध्ये आढळणारे व्हिटॅमिन-के हाडे मजबूत करण्यास मदत करते.
 
7 रोग प्रतिकारक शक्ती- भेंडीत व्हिटॅमिन-सी सह अँटिऑक्सिडेंट मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि शरीराला रोगांविरूद्ध लढायला मदत करते. भेंडीअन्नात समाविष्ट केल्याने खोकला, सर्दी,पडसे यासारखे अनेक आजारही होत नाहीत.

8 कर्करोग - भेंडी आपल्या आहारात समाविष्ट केल्याने कर्क रोग पळवून लावू शकता. ही कोलन कर्करोग बरे करण्यात फायदेशीर आहे. हे आतड्या मधील असलेले विषारी घटक बाहेर काढण्यात मदत करते, या मुळे आंतड्या स्वच्छ राहतात. आणि योग्यरीत्या काम करतात. 
 
9 वजन - भेंडी वजन कमी करण्यासह त्वचेला देखील तरुण ठेवते. याचे सेवन केल्याने केसांना सुंदर, घनदाट,आणि चमकदार करण्यासाठी करतात. याचे चिकट तत्व लिंबूसह शॅम्पू प्रमाणे वापरतात. 

10 गर्भावस्था- गरोदरपणात भेंडीचे सेवन करणे फायदेशीर आहे. या मध्ये फोलेट नावाचे पोषक घटक आढळतात जे गर्भाच्या मेंदूच्या वाढीस महत्त्वाची भूमिका बजावते.या व्यतिरिक्त भेंडीमध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.