गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (09:00 IST)

इम्युनिटी बूस्टींग डिटॉक्स ड्रिंक म्हणजे काय जाणून घ्या

कोरोना विषाणूच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना, लोक खाण्यापिण्याच्या सवयीला घेऊन सावध होत आहेत. अशा परिस्थितीत अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजेत जे आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. यासाठी आपण एबीसी डिटॉक्स ड्रिंक घेऊ शकता. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि शरीराला डिटोक्स करण्यासाठी आपण आपल्या रोजच्या दिनक्रमात याला समाविष्ट करू शकता. हे पेय पोषक तत्वांनी समृद्ध आहे.  प्रतिकारशक्ती वाढविण्यासह हे त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.
 
एबीसी डिटॉक्स ड्रिंक  म्हणजे काय आणि घरी ते कसे बनवायचे.
 
सफरचंद,बिट,आणि गाजर डिटॉक्स ड्रिंक-यालाच एबीसी डिटॉक्स म्हटले जाते.हे एक हेल्दी ड्रिंक आहे.हे सफरचंद,बीट,आणि गाजरापासून तयार केले जाते. हे शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते. एबीसी डेटॉक्स ड्रिंक  लिव्हर, किडनी, आतडे आणि त्वचेतून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो. या पेयाचे सेवन केल्याने आपण निरोगी राहतो.
 
1 सफरचंद-सफरचंद सर्वात पौष्टिक समृद्ध फळांपैकी एक आहे. व्हिटॅमिन ए   बी 1, बी 2, बी 6, फोलेट, नियासिन, झिंक, कॉपर आणि पोटॅशियम ने समृद्ध, सफरचंदांचे बरेच आरोग्याचे फायदे आहेत. सफरचंदांमध्ये फ्लेव्होनॉइड असतात. हे लिव्हर मधील  विष बाहेर काढण्यास मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन सी देखील आहे जो आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतो.
 
2 बीट-बीटरूटमध्ये व्हिटॅमिन सी, फोलेट, पोटॅशियम, आयरन आणि मॅंगनीज मुबलक प्रमाणात असतात. त्यामध्ये लाइकोपीन आणि अँथोसायनिन  सारखे अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे भाजीला त्याचा गुलाबी-जांभळा रंग देतात आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात. ही मूळभाजी   शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करते.बीटरूटमध्ये देखील अँटी इंफ्लिमेंट्री गुणधर्म असतात, जे आपल्या लिव्हरचे संरक्षण करण्यास मदत करतात.
 
3 गाजर- गाजरामध्ये व्हिटॅमिन  ए ,बी1, बी2, बी3, नियासिन, फोलेट  आणि पँटोथिनिक एसिड, कॅल्शियम, पोटॅशियम,मॅग्नेशियम आणि सेलेनियम असते .बीटा प्रमाणेच गाजर ही मूळभाजी आणि फायबरचे समृद्ध स्रोत आहे.यात बीटा केरोटीन असते,जे आपले डोळे निरोगी ठेवण्यास आणि रोगांना दूर ठेवण्यात मदत करते.व्हिटॅमिन ए शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यात मदत करतो.