रविवार, 28 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (07:06 IST)

Omicron Symptoms खोकला, सर्दी आणि ताप याशिवाय ओमिक्रॉनची ही आश्चर्यकारक लक्षणे आहेत, त्यांच्यापासून दूर राहा

omicrone virus
देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असून बर्‍याच जणांना कोरोना संसर्गामुळे आपला जीवही गमवावा लागत आहे. त्याचबरोबर देशातील कोरोना विषाणूचे नवीन प्रकार असलेल्या ओमिक्रॉनची भीतीही असल्याचे दिसून येत आहे. तज्ज्ञांप्रमाणेओमिक्रॉनमुळे लोकांना जास्त वेगाने संसर्ग होतो. अशात ओमिक्रॉनच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये.
 
कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांमध्ये खोकला, सर्दी आणि तापाची सामान्य लक्षणे दिसतात. तसेच या प्रकाराने संक्रमित लोकांमध्ये काही इतर लक्षणे देखील दिसून येत असल्यास दुर्लक्ष केले जाऊ नये. ओमिक्रॉनच्या सामान्य लक्षणांबद्दल बघायचे तर नाक वाहणे, डोकेदुखी, थकवा, शिंका आणि घसा खवखवणे.
 
हिवाळ्यात लोक सहसा सर्दी, खोकला आणि तापाची तक्रार करतात अशात कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये ही लक्षणे सहजपणे आढळू शकतात. अशात हिवाळ्यात ही लक्षणे आढळल्यास, स्वत: ला पृथक करा. दुसरीकडे, तुम्हाला इतर लक्षणे आढळल्यास Omicron चा संसर्ग देखील होऊ शकतो. ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये इतर काही लक्षणे देखील दिसून आली आहेत-
 
तज्ज्ञांच्या मते ही 5 लक्षणे ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्येही दिसून येत आहेत.
त्वचेवर पुरळ
अतिसार
डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह (गुलाबी डोळे)
रात्री घाम येणे
भूक न लागणे