बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (20:36 IST)

मधुमेहाच्या रुग्णांनी कोरोनाच्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये

कोरोनाव्हायरसचा धोका सर्वांना असला तरी पूर्वी कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हा संसर्ग अधिक धोकादायक ठरु शकतो. अशात मधुमेहाच्या रुग्णांच्या समस्या वाढत आहेत कारण मधुमेही रुग्णांचा रक्तप्रवाह फारसा चांगला नसतो अशात बरे होण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो. म्हणूनच मधुमेह असलेल्या रुग्णांनी काही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
 
कोरोनाच्या सामान्य लक्षणांपूर्वी अनेकांना त्वचेवर पुरळ येणे, सूज येणे किंवा कोणत्याही प्रकाराची त्वचेची अॅलर्जी सारख्या समस्या येत आहेत. हाय डायबिटीज अणार्‍यांना नखांवर परिणाम तसेच त्वचेवर लाल डाग यांसारखी लक्षणे अधिक आढळून येत आहेत.
 
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने मधुमेहाच्या रुग्णांची त्वचा कोरडी होते. त्वचेवर सूज, लाल डाग दिसून येतात. हे लक्षणं कोरोनामुळे देखील होऊ शकतात. अशात त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे.
 
कोरोना रुग्णांमध्ये निमोनिया धोकादायक ठरू शकतो अशात मधुमेह असल्यास श्वसनाच्या समस्या देखील वाढतात आणि आजार गंभीर होतो. अशात विषाणू शरीरात पसरतात आणि इतर अवयवांना देखील नुकसान होऊ शकतो.