गुरूवार, 9 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : रविवार, 10 ऑगस्ट 2025 (10:08 IST)

Healthy and Tasty Breakfast मशरूम सँडविच रेसिपी

मशरूम सँडविच रेसिपी
साहित्य 
मशरूम - एक कप बारीक चिरलेला 
कांदा - एक छोटा बारीक चिरलेला 
हिरवी मिरची -एक  
मिरे पूड - १/४ टीस्पून
मीठ - चवीनुसार
ऑलिव्ह ऑइल/तूप - एक टीस्पून
कॉटेज चीज - एक टेबलस्पून किसलेले
ब्रेड स्लाईस - चार ब्राऊन ब्रेड
कोथिंबीर 
कृती- 
सर्वात आधी नॉन-स्टिक पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करा. आता कांदा घाला आणि हलका सोनेरी होईपर्यंत तळा. आता हिरवी मिरची आणि चिरलेले मशरूम घाला. मशरूम मऊ होईपर्यंत ४-५ मिनिटे शिजवा. त्यात मीठ आणि मिरे पूड घाला. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थोडे चीज देखील घालू शकता. आता गॅस बंद करा आणि मिश्रण थोडे थंड होऊ द्या. आता हे मिश्रण ब्रेड स्लाईसवर पसरवा आणि दुसरा स्लाईस वर ठेवा आणि टोस्टर किंवा पॅनवर बेक करा. ते दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत बेक करा. हिरव्या कोथिंबीर चटणी किंवा टोमॅटो चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik