शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

उन्हाळ्यात करा मीठाच्या पाण्याने आंघोळ

मीठ हा आहारातला अनिवार्य घटक आहे. अनय काही कामांसाठीही मीठाचा वापर मह्त्वाचा ठरतो. 
खासकरून उन्हाळ्यात आंघोळीच्या पाण्यात दोन चमचे मीठ घातल्याने अनेक लाभ मिळतात. मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास रंग उजळतो. 
 
मृत त्वचेचा थर निघून त्वचेच्या आरोग्याची जपणूक होते आणि त्वचा मऊ तसेच चमकदार बनते. 
 
जास्त थकवा आला असताना मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास शारीरिक वेदना, थकवा कमी होतो. संसर्ग असल्यास मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा लाभ मिळतो. 
 
मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे विषारी किडा चावल्यानंतर होणारा विषप्रभाव कमी होतो. 
 
मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास शणीराची कॅल्शियमची गरज भागते. हाडं आणि नखं मजबूत होतात. या उपायामुळे मानसिक ताण कमी होतो आणि शरीराची रोगप्रतिरोधक क्षमता सुधारते.