रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

म्हणून करा स्वीमिंग

व्यायाम म्हटलं की काहीजणांच्या अंगावर काटा येतो. लवकर उठून पायपीठ करणं अथवा जीममध्ये घाम गाळणं त्यांच्या प्रवृत्तीतच नसतं. अशांसाठी पोहण्याचा व्यायाम सर्वोत्तम आहे. 

पोहण्यानं शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम मिळतो आणि लवचिकता टिकून राहण्यास मदत होते. हा व्यायाम आहे त्याबरोबर मनोरंजनही आहे.

वेगवेगळे स्ट्रोक्स शिकताना, पाण्यामध्ये खेळ खेळताना, पाण्यात चालताना एक वेगळीच मौज वाटते. पोहण्यानं शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात त्याचप्रमाणे उष्मांक जळण्यास मदत होते.

पोहणं हा तणाव नष्ट करण्याचा एक उत्तम उपाय आहे. पोहताना शरीरात इंडोफ्रिल नावाचं रसायन निर्माण होतं. हे रसायन डिप्रेशन घालवण्यासाठी परिणामकारक आहे. पोहताना संपूर्ण शरीर हलकं होतं आणि सुखावस्था प्राप्त होते..