मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 12 ऑक्टोबर 2023 (09:19 IST)

संधिवाताचा रामबाण उपाय आहे कच्च्या पपईचा चहा जाणून घ्या त्याचे फायदे

वय सरता सरता किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांशी निगडित समस्या उद्भवतात.ही एक सामान्य बाब आहे. त्या समस्यांपैकी एक समस्या आहे संधिवाताची ,या समस्येने बरेच लोक त्रस्त असतात .या मध्ये सांधे दुखी,युरिक ऍसिड चे क्रिकेटस सांध्यात जमा होणे सारखे त्रास होतात. यासाठी आपण औषधोपचार केले असणार तरी काहीही आराम मिळाला नसणार.या साठी आमच्या कडे एक चांगला घरघुती उपाय आहे.

कच्च्या पपईचा चहा,होय! हे जाणून आपल्याला आश्चर्य होणार ,परंतु पपईचा चहा आपल्या संधिवाताच्या त्रासाला दूर हरू शकतो.वैद्यकीय जगात देखील या चहाला महत्त्व दिले आहे.पपई शरीरातील युरिक ऍसिडचे प्रमाण कमी करून शरीरावरील सूज कमी करते. 
 
हा चहा कसा बनवायचा विधी जाणून घ्या.
हे चहा बनविण्यासाठी आपल्याला पाणी,कच्ची पपई,ग्रीन टी बॅग्स,किंवा हिरवे ग्रीन टी ची पाने लागणार.
आता सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन कच्च्या पपईचे तुकडे घालून द्या आणि मंद आचेवर ठेवा. हे उकळल्यावर गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा.आता हे गाळून घ्या त्यात ग्रीन टी घालून 3 मिनिटे तसेच ठेवा. चहा पिण्यासाठी तयार आहे. हा चहा गरम प्यावा.
 
फायदे- 
1 सांधेदुखीच्या समस्येमध्ये फायदेशीर आहे.
2 शारीरिक सूज कमी करण्यास उपयुक्त आहे.
3 रक्त प्लेटलेटची संख्या वाढविण्यात मदत होते.
4 शरीरातून अवांछित घटक काढून टाकून अंतर्गत स्वच्छते साठी उपयुक्त आहे.