बुधवार, 11 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024 (07:00 IST)

या फळात आहे पुरुषांच्या 5 समस्यांवर उपाय, जाणून घ्या

शिंघाड़े  महिला आणि पुरुष दोघांसाठीही आरोग्यदायी आहे. संशोधनात असे म्हटले आहे की शिंघाडयाचेमध्ये असलेले फायबर आतड्याची हालचाल सुलभ करते. यासोबतच रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. हे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करू शकते. पोटाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर शिंघाडयाचे सेवन करावे. याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या.
 
थकवा दूर करते -
पुरुषांसाठी शिंघाडयाचे फायदे आहे . कामामुळे येणारा थकवा कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे आणि कॅलरीजचे प्रमाण कमी आहे, ज्यामुळे तुम्हाला अतिरिक्त कॅलरीशिवाय समाधान मिळते. परिणामी, तुमचे शरीर उत्साही राहते आणि थकवा कमी होतो.
 
शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी उपयुक्त
 
आजकाल अनेक पुरुषांना शुक्राणूंची संख्या कमी होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतोही समस्या सोडवण्यासाठीशिंघाडयाचे सेवन करणे फायदेशीर आहे. ह्याच्या पाण्याचे सेवन शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. हे शुक्राणूंची गतिशीलता सुधारण्यास देखील मदत करू शकते. याशिवाय प्रजनन क्षमता वाढवण्यासही हे उपयुक्त आहे.
 
पचनसंस्थेसाठी फायदेशीर-
या मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, जे बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यास मदत करते. तसेच पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. याच्या सेवनाने बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
 
हृदयाचे आरोग्य  सुधारते
याच्या पांयचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास उपयुक्त ठरू शकते. हे पोटॅशियममध्ये समृद्ध आहे, जे स्ट्रोक आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. याच्या नियमित सेवनाने हृदयाशी संबंधित समस्या लक्षणीयरीत्या कमी होतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit