शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 3 जुलै 2021 (08:00 IST)

पावसाच्या ओलसरपणामुळे येणारा दमट वास दूर करण्यासाठी हे अवलंबवा

पावसाळ्यात अशा काही गोष्टी असतात ज्यांचा मुळे दमट वास येतो. ओलावामुळे दमटपणा येतो आणि मग वास येऊ लागतो.आपण या वासामुळे त्रस्त झाले आहात तर काही टिप्स आहेत ज्यांना अवलंबवून आपण या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 कपड्यातून वास येत असल्यास एका वाटीत कॉफी भरून त्या ठिकाणी ठेवा जिथून कपड्यांना वास येत आहे.काहीच वेळात वास येणं कमी होईल.
 
2 सतत बंद असलेल्या जागेतून वास येतो अशा परिस्थितीत हायड्रोजन पेरोक्साइड पाण्यात मिसळून त्याची फवारणी करा.थोड्याच वेळात या वासापासून मुक्ती मिळेल.
 
3 व्हिनेगर आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण देखील प्रभावी मानले जाते. आपण एका बाटलीत बेकिंग सोडाचे घोळ तयार करा.आणि बाटलीच्या साहाय्याने फवारणी करा.थोड्याच वेळात वास नाहीसा होईल.
 
 
4 लेमन ग्रास आणि लॅव्हेंडरच्या तेलात पाणी मिसळून खोलीत आणि ओलाव्याच्या ठिकाणी फवारणी करा.हे नैसर्गिक रूम फ्रेशनर म्हणून काम करत.
 
5 घरातील,कोणत्याही प्रकारचा वास काढायचा असल्यास एका दिव्यामध्ये  कापूर पेटवून संपूर्ण घरात किंवा वास येणाऱ्या जागेत ठेवून द्या.वास येणं नाहीसे होईल.