1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 1 जुलै 2021 (09:00 IST)

मेकअप काढण्यासाठी बदामाचे तेल का वापरायचे जाणून घ्या

बर्‍याच लोकांना माहित आहे की मेकअप काढून टाकणे खूप महत्वाचे आहे. मेकअप काढण्यासाठी बदाम तेलाचा वापर करणे चांगला पर्याय आहे.चला,आपण बदामाच्या तेलाचा मेकअप काढण्यासाठी कसा वापर करावा आणि मेकअप काढण्यासाठी याचे कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊ या-
 
 
मेकअप काढण्यासाठी बदाम तेल कसे वापरावे-
 
* सर्वप्रथम बदामाचं तेल तळहातावर चांगल्या प्रमाणात घ्या,नंतर चेहऱ्यावर मॉलिश करा.लक्षात ठेवा की डोळ्याजवळ आणि त्याच्या आजू-बाजूस हळुवार हाताने मसाज करा.
 
* या नंतर कापसाचा मोठा तुकडा घेऊन त्याला गुलाब पाण्यात भिजत घालून पिळून घ्या आणि याने संपूर्ण चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे पुसून घ्या.
 
 
बदाम तेलाने मेकअप काढण्याचे फायदे -
 
1 या मध्ये कोणत्याही प्रकारचे रसायन नसतात.या मुळे चेहऱ्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
 
2 सामान्यतः मेकअप काढल्यावर चेहऱ्यावरील ओलावा नाहीसा होतो.परंतु बदामाचं तेल वापरल्याने चेहऱ्याला पोषण मिळतं.
 
3 या शिवाय जर चेहऱ्यावर सुरकुत्या आणि फ्रीकलची समस्या असेल तर हे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.
 
या गोष्टी लक्षात ठेवा-
 
* जर वॉटरप्रूफ मस्करा लावला आहे तर ते स्वच्छ करण्यासाठी जास्त  प्रमाणात तेल घेऊन त्याने मालिश करा.
 
* चेहऱ्यावरून मेकअप काढल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.