1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

आरोग्यसंपन्न जीवनासाठी...

आरोग्यसंपन्न जीवनासाठी
आपले शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे. या महाभूतांना अनूकूल अशी आपली दिनचर्या असावी. पण त्याचबरोबर इतरही काही बाबींचे पालन आपण केले पाहिजे. व्यायाम नेहमी करणे गरजेचे आहे. योग्य आहार घ्यायला हवा. शरीराला विश्रांतीही चांगली मिळाली पाहिजे. या सगळ्या बाबींचे योग्य पालन केले पाहिजे. तरच शरीर आरोग्यसंपन्न राहील. त्यासाठीच खाली दिलेल्या सूचना पाळा.

ND
व्यायाम-
* प्रातर्विधीनंतर व्यायाम केल्यास रक्ताभिसरण सुधारते.
* फिरणे, जॉगिंग, योगासनेँ प्राणायाम, सूर्यनमस्कार, सायकलिंग या पैकी कोणताही एक व्यायाम चांगला.
* फिरण्याची जागा मोकळी व प्रदुषण रहित असावी.
* आपले वय व शक्तीप्रमाणे दीर्घश्वसन करून भराभर चालणे फायद्याचे आहे.
* योगासनांची निवड करताना मार्गदर्शकाची मदत घ्यावी.
* योगासन करण्यात सातत्य असल्यास त्यांचा फायदा होतो.
* फिरणे व व्यायामापूर्वी लिंबू पाणी घेतल्यास हरकत नाही. पण त्यासाधी व त्यानंतर काही खाऊ नये.

ND
मालिश-
* शरीरासाठी मालिश अत्यावश्यक आहे. त्यामुळे उत्साह व रक्ताभिसरण सुधारते.
* विशेषत: हिवाळ्यात तेल मालिश करून कोवळ्या उन्हात बसल्याने फायदा होतो.
* मालिश करण्यासाठी तीळ किंवा मोहरीचे तेल योग्य आहे पण ते शरीरास गरम पडत असल्यास साध्या खोबरेल तेलानेही मालिश करता येऊ शकते.