तुळशीची पाने कृमीनाशक असतात. तुळशीच्या जास्तीत जास्त कुंड्या घराच्या बाहेर ठेवल्या तर घरात डास कमी येतील. तुळशीचा रस अंगाला रोज चोळला तर चिकनगुनियासारखे होणारे आजार होणार नाहीत. दातदुखीवर तुळस प्रभावी आहे. तुळशीची पाने घेऊन त्यात थोडी मिरे पूड घालून त्याच्या लहान लहान गोळ्या दाताखाली ठेवल्याने आराम मिळतो.
कानाचे दुखणे असेल तर तुळशीच्या पानाचा रस काढून त्याच्या गोळ्या कानात घातल्याने दुखणे कमी होते. आपल्याला चेहर्याची कांती वाढवायची असेल तर तुळशीच्या पानांना वाळवून त्याचे चूर्ण बनवावे व उटण्यासारखे लावावे. शरीरावर कुठे सूज आली असेल तर तिथे तुळशीचा रस लावल्यामुळे ती नक्की कमी होते. ताप उतरत नसेल तर तुळशीच्या पानांचा काढा करून प्यावा. त्यामुळे घाम सुटून ताप कमी होतो.
तुळशीची पाने वाटून त्याचा रस प्यायला तर पचन शक्ती वाढते. लहान मुलांचे पोट साफ होत नसेल किंवा फुगल्यासारखे वाटत असेल तर तुळशीच्या पानांचा रस काढून त्याला थोडा कोमट करून मुलांना दिल्याने त्रास कमी होतो. लिंबूच्या रसासोबत पानांचे सेवन केल्याने मूत्ररोगात फायदा होतो. हृदयासाठी तुळशी हितकर आहे.