शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

दात चमकदार हवे आहे मग हे करा ...

रात्री गोडधोड खाल्ल्यामुळेही दात सडण्याची शक्यता जास्त असते. दिवसभर काहीना काही खात राहिल्यास हिरड्या दुखू लागतात. त्यातच खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे दातही खराब होतात. म्हणून योग्य प्रकारे आणि योग्य तेच खायला हवे. दातांचे रक्षण करायचे तर काहीही खाऊन चालणार नाही. ठराविक पदार्थांमध्ये असे काही गुणधर्म आहेत की ते आहारात असतील तर दात मजबूत आणि चमकदार होतातच, पण त्यांची सेन्सिटिव्हिटीही दूर राहते. 
 
- फक्त एक स्ट्राबेरी कुस्करून त्यात आपला टूथब्रश बुडवायचा. त्यानं दात साफ केल्यास ते हि-यासारखे चमकू लागतात असं म्हटलं जातं. हे खरंही आहे. कारण स्ट्रॉबेरीमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड असते. दातांच्या कडा घालवून त्यांची कठोरता कमी करण्याचं काम स्ट्रॉबेरी करू शकते. स्ट्रॉबेरीमध्ये मॅलिक अ‍ॅसिडही भरपूर प्रमाणात असतं. मात्र दात साफ करायचे झाल्यास पिकलेली स्ट्रॉबेरी घेणंच चांगलं. स्ट्रॉबेरीचं एक फळ नुसतं दातांवर घासलं तरीही दात स्वच्छ होतात. 
 
- केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात असलेले पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मँग्निज दातांवरील काळे डाग हटविण्यास मदत करतात असे म्हटले जाते. हे खरंच आहे. पिकलेल्या केळ्याच्या सालीचा आतला भाग किमान दोन मिनिटं दातांवर घासल्यास तीन आठवड्यांनंतर दात चमकदार होतील. मात्र केळ्याचे साल हिरड्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे दातांची सखोल सफाई होणार नाही. 
 
- कांदा आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. आहारात कांदा असेल तर शरीरातील बॅक्टेरिया नाहीसे होतात. जेवणातील कांद्यामुळे दातांमध्ये कॅव्हिटीची समस्या राहणार नाही.