शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

लंचनंतर अजिबात नका करू हे काम

फिरणे- काय आपण ही लंच घेल्यानंतर फेर्‍या मारता? पण ही एक हानिकारक सवय आहे जी लगेच थांबवायला हवी. तज्ज्ञांप्रमाणे आमची पाचक प्रणाली इतकी मजबूत आहे की लंचमध्ये आपण कितीही अटरम- शटरम खाल्लं असेल तरी सर्वकाही पचून जातं. 
 

या दरम्यान आमची प्रणाली आहाराला पचवून सर्व आवश्यक पोषण आम्हाला ऊर्जेच्या रूपात देतं. पण आमचे हे सिस्टम जरा संवेदनशील असल्यामुळे तेव्हा त्याला आपले कार्य सुरळीत रित्या पार पडण्यात अडथळा निर्माण होतो जेव्हा आपण त्याला यातना देतात. म्हणून दुपारी लंच केल्यानंतर फिरणे, किंवा काही हेवी कार्य करण्याऐवजी 15 ते 20 मिनिट आराम करण्याचा सल्ला दिला जातो.

ब्रश करणे- लंचनंतर ब्रश करणे योग्य नाही. कारण आपण सिट्स असलेला आहार घेतला असल्यास ब्रश केल्याने दातांवरील ती परत निघून जाते ज्याला इनेमल असे म्हणतात.

अधिक पाणी पिणे- आपण जेवल्यानंतर अधिक मात्रेत पाणी पित असल्यास पाचक प्रणालीवर याचा गंभीर प्रभाव होतो. यामुळे अनेक रोग उद्भवण्याची शक्यता असते. खरं म्हणजे जेवताना आणि जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणे विष समजले जाते. जेवण झाल्यावर कमीत कमी अर्धा किंवा तासाभरानंतर पाणी पिणे योग्य आहे.

धूम्रपान करणे- लंच केल्यानंतर शरीराचा रक्ताभिसरणच जलद असतं. लंचनंतर धूम्रपान केल्याने त्याचा धूर सरळ आपल्या शरीरात शिरून फुफ्फुसं आणि मूत्रपिंडाला नुकसान करतं.

ड्रायविंग- जेवण पचविण्यासाठी अधिक रक्ताची गरज असते, ज्यासाठी मेंदू मदत करतं. परंतू जेवल्यानंतर आपण ड्रायविंग करत असाल तर मेंदू त्यावर आपलं लक्ष केंद्रित करतो आणि जेवण पचवण्यात त्याची मदत मिळू पात नाही.

झोपणे- लंचनंतर लगेच झोपल्याने पचन संबंधी रोग होऊ शकतात. याने आपल्या गॅससंबंधी समस्याही उद्भवू शकते.