शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जानेवारी 2019 (14:05 IST)

टक्कलपणेच्या समस्येचे निराकरण करण्याचे 5 उपाय

पुरुषांमध्ये टक्कलपणाची समस्या जास्त पाहिली जाते. बर्याच वेळी तर अगदी लहान वयातच बर्‍याच पुरुषांचे केस खूपच गळू लागतात आणि हळू-हळू काही भागांचे केस पूर्णपणे गायब होऊ लागतात, तर बर्‍याच वेळा पूर्ण डोक्यात टक्कलपणा येऊ लागतो. चला, आपल्याला असे काही घरगुती उपाय सांगू, ज्यांच्या वापर करून आपण टक्कलपणाची समस्या टाळू किंवा कमी करू शकता. 
 
1. हिरव्या कोथिंबीराच्या रसाने आपल्या डोक्याची नियमितपणे मालिश करा.
 
2. आवळा पावडरमध्ये नारळ किंवा चमेलीचे तेल मिसळा आणि या मिश्रणाने डोक्याची मालिश करा.
 
3. कोणत्याही स्वरूपात आवळ्याचे सेवन नेमाने करा.  
 
4. डाळिंबाचे दाणे, पाने आणि साल एकत्र वाटून घ्या. आता या पेस्टमध्ये मोहरीचे तेल घाला आणि लाईट फ्लेमवर शिजवा. सर्व गोष्टी शिजल्या आणि तेल राहिल की ते फिल्टर करून घ्या. आता हे तेल नियमितपणे केसांमध्ये लावा. 
 
5. नाकच्या दोन्ही छिद्रांमध्ये एका महिन्यासाठी कडूलिंबाचे तेल 4-4 थेंब नियमितपणे टाका.