Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे

Updated: शनिवार, 22 सप्टेंबर 2018 (16:53 IST)
 
* बेदाणांमध्ये नैसर्गिकरीत्या साखर मुबलक प्रमाणात असल्याने रात्रभर बेदाणे पाण्यात भिजत ठेवा. यामुळे साखरेचा अंश कमी होऊन न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढते. 
 
* बेदाण्यांमुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. त्याचे पाणी टॉक्सिन घटक बाहेर टाकण्यास मदत करते. 
 
* बेदाण्यांमधील फायबर घटक पचन संस्थेला चालाना देण्यास मदत करतात. यामुळे पचन सुधारते. 
 
* बेदाण्यांमध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे घशातील इंफेक्शन, तोंडाला येणारी दुर्गंधी कमी होते. 
 
* बेदाण्यांमध्ये कॅल्शियम आणि मायक्रो न्यूट्रीएंट्‌स असतात. यामुळे हाडांना मजबुती मिळते. 
 
* बेदाण्यांमधील आयर्न घटक अ‍ॅनिमियाच्या रूग्णांना फायदेशीर ठरते. यामुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत होते. 
 
* फायबरसह बेदाण्यांमध्ये असलेले अनेक आवश्यक पोषकघटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉलची पातळी सुधारण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाचे विकार असणार्‍यांसाठी बेदाणे फायदेशीर ठरतात. 
 
* कसा कराल उपाय - कपभर गरम पाण्यामध्ये मूठभर स्वच्छ धुतलेले बेदाणे भिजत ठेवा. सकाळी हे पाणी थोडे गरम करून प्यावे. त्यानंतर बेदाणेदेखील चावून खावेत.
 
शीतल माने 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

कोपर आणि गुडघे काळे पडले आहेत? काळसरपणा कमी करण्यासाठी करा हे उपाय करा

रात्रीच्या जेवणानंतर हे पदार्थ खाऊ नका, झोप आणि पचनावर होऊ शकतो परिणाम

सुरकुत्या आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यासाठी हे योगासने करा

लघु कथा : गर्विष्ठ उंट आणि चार मित्रांची गोष्ट

Gatari Amavasya 2026 Wishes In Marathi गटारी अमावस्या शुभेच्छा मराठी

पुढील लेख
Show comments