मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

ढेकर येत असल्यास 10 सोपे उपाय

belch
ढेकर म्हणजे पोटातील गॅस तोंडाद्वारे बाहेर पडणे. हे आजाराचे लक्षण नसले तरी चार चौघात ढेकर येणे योग्य दिसत नाही. जेवताना अतिरिक्त वारं पोटात शिरल्यामुळे ढेकर येण्याचा प्रकार घडतो. येते आम्ही ढेकरावर उपाय सांगत आहोत जे अगदी सोपे आहेत:
पाणी: सतत ढेकर येत असल्यास घुट घुट गार पाणी प्यावं.
 
बडीशेप:  पोटासंबंधित समस्यांसाठी बडीशेप लाभदायक आहे. याने गॅसची समस्या दूर होते. बडीशेपचे रस आणि गुलाबजल समप्रमाणात मिळवून पिण्याने उचकी आणि ढेकर येणे थांबते. आपण बडीशेप चावूनही खाऊ शकता.
 
वेलची: ढेकर आल्यावर वेलची टाकून केलेला चहा हळू-हळू प्यावा.
 
पोदीना: पोदीनाचे सेवन केल्याने पोट स्वच्छ राहतं. पोदीनाचे पाने चहात टाकून सेवन करावे.
 
कोथिंबीर: ढेकर येत असल्यास कोथिंबीरची दंडी चावावी.
 
सोडा: गॅस विकारात सोडा पिणे फायदेशीर आहे. सोडा असॅडिक असल्यामुळे गॅसपासून मुक्ती मिळते.
 
लिंबू: काही न मिसळता ताज्या लिंबाचे रस प्यावं.
 
आलं: आल्याचा चहा पिण्याने किंवा आल्याचा रस मध मिसळून पिण्याने फायदा होतो.
 
लवंग: सतत ढेकर येत असल्यास तोंडात एक लवंग ठेवून चोखावी.
 
दूध: उचकी किंवा ढेकर येत असल्यास गार दूध पिण्याने फायदा होतो.