शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑगस्ट 2019 (10:01 IST)

केस गळतीवर घरच्या घरी करा उपचार...

– केस गळत असल्यास शुद्ध तिळाचे जेल केसांना लावावे.
– अनशापोटी रोज 1 चमचा तीळ चावून खावेत.
– रोज सकाळी एक लसूण पाकळी चावून खावी.
– रोज आंघोळीपूर्वी अर्धा ते 1 तास आधी कांद्याचा रस केसांना चोळावा. केस गळायचे थांबतात.
– एकाच जागी भांग ठेवल्यास तो फाटत जातो. यासाठी शक्‍य असेल तेवढी भांगाची जागा बदलावी. म्हणजे चेहराही वेगळा दिसतो.
– कॉटच्या कडेला मान मागे कडेखाली ठेवून प्रत्येक नाकपुडीत 3 ते 4 थेंब शुद्ध गाईचे तूप टाकावेत. केसांना फायदा होतो.
– कडिपत्त्याची 4 ते 5 पाने रोज चावून खावीत.
– संत्रे किंवा लिंबाची साले उकडून मिक्‍सरमधून काढून केसांच्या मुळाशी चोळावीत.