मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: शनिवार, 6 जुलै 2019 (14:49 IST)

आरोग्यासाठी काही फायद्याच्या गोष्टी

दोन्ही वेळा जेवण झाल्यानंतर थोडंसं गूळ खाल्ल्याने अॅसिडीटीची तक्रार होत नाही.
लवंग आणि वेलदोड्याची पूड समांतर मात्रेत मिसळून जेवण्यानंतर खाल्ल्याने अॅसिडीटीची तक्रार होत असून तोंडाची दुर्गंधही दूर होते.
एक चमचा धणे पूड आणि चिमूटभर हळद मिसळून ही पेस्ट रात्री पिंपल्सवर लावावी आणि सकाळी धुऊन टाकावी. काही दिवस ही पेस्ट वापरल्याने पिंपल्स नाहीसे होतील.
केळी सालासकट शेकावी. केळीचे तुकडे करून मिरपूड टाकून गरम-गरम खायला हवे. हे दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतं.