गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जून 2019 (16:44 IST)

नववधू नवऱ्या सोबत देवदर्शनाला आली आणि प्रियकरासोबत पळून गेली

bride came along with her husband
नुकतेच लग्न झाल्यानंतर देवदर्शनासाठी नवर्‍याबरोबर आलेल्या नववधूने प्रियकराबरोबर पळून गेली आहे, अहमदनगर येथील पाथर्डी तालुक्यातील मढी येथील कानिफनाथ मंदिर परिसरात हा प्रकार घडला आहे. ही घटना जिल्हाभरात चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, तीन दिवसांपूर्वी विवाहाबद्ध झालेली वधुवराची जोडी मढी येथे चैतन्य कानिफनाथांच्या दर्शनासाठी आली होती. तर मोटरसायकलवरून देवदर्शनासाठी आलेल्या या नवदाम्पत्याच्या पाठीमागेच नववधूचा प्रियकरही होता. अगोदर ठरल्याप्रमाणे नववधूने नवर्‍याला दुचाकी वाहनतळाच्या एका बाजूला लांब उभी करण्यास सांगितले होते. देवाच्या दारात बायकोचा आग्रह न मोडता नवर्‍याने गाडी देवस्थान वाहनतळच्या आतील बाजूस काही आंतरावर नेऊन लावली होती. गडाच्या पायर्‍या उतरतत असताना नवरा पुढे नवरी मागे अन् काही अंतर ठेवून प्रियकर पायर्‍या उतरत होता. त्याचवेळी दोघांमध्ये खुणवाखुणव सुरू होती. नियोजनाप्रमाणे नवरी वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर थांबली. नवरा मोटारसायकल आणण्यासाठी गेला. त्याचवेळी मागून आलेल्या प्रियकराने नववधू असलेल्या प्रेयसीला स्वत:च्या मोटरसायकलवर बसवून मढीतून पोबारा केला. काही वेळाने दुचाकी घेऊन आलेला नवरदेव जेथे नववधू उभी होती, त्या प्रवेशद्वारा जवळ आला. इकडे तिकडे चोहीकडे नजर फिरवली. त्याला आपली नववधू दिसली नाही. तो कावरा बावरा झाला. घामाने डबडबून गेला. त्याने दुकानदाराकडे चौकशी केली. परंतु, भाविकांच्या वर्दळी पुढे लक्ष नव्हते. काही वेळानंतर खरा प्रकार लक्षात आला.