1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

चक्क चार तरुणांबरोबर लग्न करून केली फसवणूक

marriage with four groom in Manmad
एका तरुणीने एक दोन नव्हे तर चक्क चार तरुणांबरोबर लग्न करून त्यांची फसवणूक केली आहे. ही तरुणी पैशांसाठी नावे बदलून गुपचूप लग्न करायची. 
 
मनमाडमधील संभाजी नगर येथील रहिवासी अशोक जगन्नाथ डोंगरे यांच्या मुलाला लग्नासाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू होता. यातच त्यांची ओळख लातूरमधील अहमदपूरच्या पूजा भागवत गुळे सोबत झाली. या महिलेने म्हटलं की, माझ्या बघण्यात एक मुलगी आहे, पण ते गरीब असल्याने तुम्हाला त्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून तिने बंडू नामदेव केंद्रे यांची मुलगी ज्योती हिच्याशी विवाह लावून दिला. यात ४० हजार रुपये रोख व ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण ९० हजार रुपये खर्च दिला गेला. लग्न झाल्यानंतर १४ दिवस ज्योती येथे राहिली. त्यानंतर ती माहेरी गेली. काही दिवसांनी अशोक डोंगरे हे त्यांच्या मुलाला घेऊन ज्योतीला आणण्यासाठी गेले. त्यावेळी सागर पालवे या तरुणाशी ज्योतीचा विवाह होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. हा प्रकार पाहिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांचं लक्षात आलं.