शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जून 2022 (20:34 IST)

Home Remedies : जुलाब होत असल्यास हे 5 घरगुती उपाय करून पहा

natural remedies
Home Remedies For Loose Motions  :कधी कधी काही चुकीचे खाल्ल्यास पचनात बिघाड होतो,आणि जुलाब लागतात. जुलाब लागल्यामुळे खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये या कडे विशेष लक्ष द्यावे लागते. जुलाब लागल्यावर शरीरात पाण्याची कमतरता होते आणि अशक्तपणा येतो. जुलाब लागले असल्यास काही घरगुती उपाय केल्याने आराम मिळतो. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
  1 आल्याचा चहा -
आलं हे अतिसार, अपचन आणि पोटदुखीसाठी नैसर्गिक उपाय मानले जाते. आल्यामध्ये आढळणारे जिंजरॉल पोटातील समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते. जुलाब झाल्यास गरम पाण्यात आलं मिसळून चहा प्यायल्याने फायदा होतो. 
 
2 पुदीना चे सेवन -
पुदिन्याच्या सेवनाने पोटदुखी, उलट्या, मळमळ आणि जुलाब यापासून आराम मिळतो. पुदिना कच्चा किंवा शिजवून खाल्ला जाऊ शकतो, पण तो कच्चा चघळल्याने जुलाबात आराम मिळतो. 
 
3 लवंगा -
पोट बिघडल्यास लवंगाचे 1 ते 2 तुकडे एक चमचा मधात मिसळून घ्या, विशेषत: गॅसमुळे छातीत जळजळ होत असताना याचे सेवन केले जाते. याशिवाय पाण्यात लवंग टाकून ते चहासारखे गरम करून प्यायल्यानेही फायदा होतो. 
 
4 लिंबूपाणी -
लिंबू पाणी अपचनाच्या बाबतीत देखील चांगले सिद्ध होते. त्यामुळे जुलाबामुळे होणारी पाण्याची कमतरताही पूर्ण होते आणि पोटफुगी असल्यास तेही बरे होते. 
 
5 जिरे -
पोटदुखी आणि गॅस झाल्यासही जिऱ्याचे सेवन केले जाऊ शकते. त्यामुळे काही प्रमाणात जुलाबही दूर होतात. 2चमचे जिरे बारीक करून पाण्यात मिसळून प्यावे. जुलाबाच्या त्रासापासून आराम मिळेल.