मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 6 जून 2022 (14:49 IST)

White Discharge व्हाइट डिस्चार्जमुळे त्रस्त असाल तर घरगुती उपाय अमलात आणा

महिलांसाठी सर्वात महत्त्वाचं असतं प्रायव्हेट पाटर्सची स्वच्छता. ते निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर अनेक समस्या उद्भवू शकतात. अस्वच्छतेचा प्रभाव पार्टनरसोबत संबंधांवर देखील दिसून येतो. अशात महिलांसाठी व्हाइट डिस्चार्ज देखील एक सामान्य समस्या आहे. याला ल्यूकोरिया देखील म्हणतात. अनेकदा ही समस्या घातक ठरु शकते. या दरम्यान महिलांच्या पोटात दुखणे किंवा कंबर दुखणे असा त्रास होतो. अशात महिला अनेक प्रकाराच्या औषधांचे सेवन करतात ज्याचा शरीरावर नकारात्मक प्रभाव दिसू लागतो. आपणही अशा समस्यामुळे त्रस्त्र असाल तर जाणून घ्या काही घरगुती उपाय-
 
व्हाइट डिस्चार्ज कारण?
व्हाइट डिस्चार्ट शरीरात कमजोरीमुळे होतो. पण याच्या रंगात बदल होत असल्यास गंभीर समस्येचे संकेत समाजवे. जर व्हाइट डिस्चार्ज थिक रिलीज होत असेल तर हे ईस्ट इंफेक्शनचे कारण असू शकतं. व्हाइट डिस्चार्जचे इतर कारणं म्हणजे पार्टची योग्यरीत्या क्लीनिंग न करणे, ताण किंवा शरीरात पोषक घटकांची कमी सामील आहे. परंतु अधिक डिस्चार्ज होत असल्यास डॉक्टराचा सल्ला घेतला पाहिजे. तरी आपण काही घरगुती उपाय देखील करुन बघू शकता-
 
पेरूची पाने
ज्याप्रकारे पेरु खाण्याचे फायदे आहेत त्याच प्रकारे त्याच्या पानांमध्ये देखील पोषक तत्व आढळतात. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि कॉर्बोहाइड्रेट आढळतं. अशात आपण व्हाइट डिस्चार्जची समस्या कमी करु शकतो. याने प्रायव्हेट पार्टमध्ये खाज देखील होणार नाही. यासाठी आपल्याला पेरूची पाने पाण्यात उकळून घ्यायची आहे. याला गार व्हायला ठेवून द्यावं. नंतर दिवसातून दोन याचे सेवन करावे.
 
तुळस
तुळशीत अनेक औषधी गुण आढळतात. तुळशीच्या चहाचे सेवन केल्याने व्हाइट डिस्चार्जच्या त्रासापासून मु्क्ती मिळू शकते. मिक्सरमध्ये तुळस आणि जरा पाणी टाकून मिक्स करुन घ्या. नंतर यात मध घाला. दिवसातून दोनदा हे ड्रिंक प्या. या व्यतिरिक्त आपण दुधासोबत तुळस देखील घेऊ शकता.
 
मेथीच्या बिया
व्हाइट डिस्चार्जच्या समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी पाण्यात मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा. नंतर याला गाळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या.
 
आवळा
आवळा एक सुपरफूड आहे. यात व्हिटॅमिन सी आणि अनेक पोषक घटक आढळतात. ज्यामुळे हे आरोग्यासाठी फायद्याचे आहे. आवळा खाल्ल्याने इम्युनिटी वाढते. नियमित रूपात आवळा खाल्ल्याने व्हाइट डिस्चार्जचा त्रास कमी होतो.