शनिवार, 15 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By
Last Modified: गुरूवार, 13 नोव्हेंबर 2025 (08:00 IST)

चविष्ट अशी आवळा-बीटाची चटणी; जी जेवणाची चव वाढवेल

Amla Beetroot Chutney
साहित्य-
पाणी - ५०० मिली
आवळा - २९० ग्रॅम
तेल - २ टेबलस्पून
मोहरी - १ टीस्पून
जिरे - १ टीस्पून
आले किसलेले - १ टेबलस्पून
कढीपत्ता - १ टेबलस्पून
किसलेले बीट - ६० ग्रॅम
लाल मिरची पावडर - १ टीस्पून
मीठ - १ टीस्पून
गूळ - १ टेबलस्पून
कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये ५०० मिली पाणी उकळवा. व त्यात आवळे घाला, झाकण ठेवा आणि १२-१५ मिनिटे उकळवा.आता गॅस बंद करा आणि ५-७ मिनिटे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर आवळ्यातील बिया काढून टाका आणि त्यांचे तुकडे करा. एका भांड्यात ठेवा. आता एका पॅनमध्ये २ टेबलस्पून तेल गरम करा, त्यात १ टीस्पून मोहरी आणि १ टीस्पून जिरे घाला. सुगंध येईपर्यंत परतून घ्या. आता आले किस आणि कढीपत्ता घाला. व १ मिनिट परतून घ्या. तसेच किसलेले बीट घाला आणि १ मिनिट परतून घ्या. नंतर उकडलेले आवळे घाला आणि चांगले मिसळा. यानंतर तिखट,  मीठ आणि गूळ घाला. व मिश्रण ढवळून घ्या. आरा उरलेले आवळ्याचे पाणी घाला आणि ५ मिनिटे शिजवा. तसेच गॅस बंद करा आणि चटणी थंड होऊ द्या. तर चला तयार आहे आवळा-बीटाची चटणी रेसिपी, थंड झाल्यावर, रेफ्रिजरेटरमध्ये हवाबंद डब्यात ठेवा.   
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik