Sunburn Home remedies सनबर्नच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी हे उपाय करून पहा

Last Modified गुरूवार, 26 मे 2022 (16:06 IST)
सूर्यप्रकाशामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते आणि त्वचेच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. विशेषत: उन्हाळी हंगामातील कडक सूर्यप्रकाशामुळे त्वचेचे अधिक नुकसान होते. प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्वचा करपते आणि त्वचेवर लाल ठिपके दिसतात. या स्थितीला सनबर्न म्हणतात. सनबर्न हे सूर्यप्रकाश आणि अतिनील किरणांच्या संपर्कात आल्याने होणाऱ्या नुकसानाचे लक्षण आहे. जेव्हा सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरणे त्वचेवर पडतात तेव्हा त्वचेवर त्याच्याशी संबंधित प्रतिक्रिया होते. त्यामुळे त्वचेवर खाज, संवेदना आणि सूज यासारख्या समस्या उद्भवतात. त्वचेला सूर्याच्या नुकसानापासून पुनर्प्राप्तीची स्वतःची यंत्रणा आहे, परंतु यास बराच वेळ लागू शकतो. त्याच वेळी, जर उन्हाचा त्रास जास्त असेल तर लोकांना त्वचेच्या गंभीर समस्या देखील होऊ शकतात. सनबर्न झालेल्या त्वचेपासून आराम देण्यासाठी आणि सनबर्नपासून लवकर बरे होण्यासाठी काही घरगुती उपायांचाही प्रयत्न केला जाऊ शकतात ज्यामुळे त्वचा लवकर बरी होण्यास मदत होते. अशा काही टिप्स तुम्ही इथे वाचू शकता तसेच सनबर्नच्या लक्षणांबद्दलही वाचू शकता.

सनबर्नची लक्षणे काय आहेत? Symptoms of Sunburn on skin
त्वचा लाल होणे
कोरडी त्वचा
त्वचा ताणणे
खाज सुटणे
वेदना आणि सूज
त्वचा काळी पडणे

सनबर्नपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय Home remedies to get rid of Sunburn
लिंबू आणि बेसन
बेसन त्वचेला एक्सफोलिएट करते तसेच मऊ बनवते. सनबर्न झाल्यास बेसन आणि लिंबाचा रस एकत्र करून त्वचेवर लावल्यास फायदा होतो. लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड आढळते जे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करतं. यामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचेला चमक येते. लिंबू आणि बेसन पेस्ट चेहऱ्यावर अशा प्रकारे लावू शकता- 2 चमचे बेसन घ्या. त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. गरजेनुसार त्यात गुलाबपाणी टाकून क्रीमी पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 30 मिनिटे तशीच राहू द्या. चेहरा थंड किंवा साध्या पाण्याने धुवा आणि नंतर मॉइश्चरायझिंग क्रीमने चेहऱ्याला मसाज करा.
या सोप्या टिप्स देखील उपयोगी पडतील
टोमॅटो मॅश करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी चेहरा धुऊन घ्या.
नारळाचे पाणी चेहऱ्यावर लावल्याने सन टॅन आणि सनबर्नची समस्याही कमी होते.
काकडी, दुधी आणि टरबूज यांसारख्या रसदार भाज्या आणि फळे मॅश करा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे उन्हामुळे होणारे नुकसान कमी होते आणि सनबर्नपासून आराम मिळतो.
पुदिन्याची पाने कडुलिंबाच्या पानांसोबत थंड पाण्यात बारीक करून चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेला आराम मिळतो आणि उन्हामुळे होणारे नुकसान कमी होते.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

CBSE Recruitment 2022: CBSE सहसचिव पदांसाठी भरती, तपशील, ...

CBSE Recruitment 2022: CBSE सहसचिव पदांसाठी भरती, तपशील, पात्रता, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
CBSE Jobs 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सहसचिव पदांसह शेवटच्या पदांची ...

Yoga For Better Eyesight: डोळ्याची दृष्टी वाढवण्यासाठी या ...

Yoga For Better Eyesight: डोळ्याची दृष्टी वाढवण्यासाठी या  5 योगासनाचा सराव करा
Yoga For Eyes: डोळे ही शरीरातील सर्वात महत्वाची इंद्रिये आहेत आणि तरीही लोक त्यांची योग्य ...

Career Tips : वाणिज्य शाखेतून बारावी केल्यानंतर या ...

Career Tips : वाणिज्य शाखेतून बारावी केल्यानंतर या अभ्यासक्रमात करिअरच्या संधी निवडा
कोणत्याही वाणिज्य पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यासाठी करिअरमध्ये चांगल्या प्लेसमेंटसाठी ...

Mobile phone side effect : जास्त फोन वापरल्याचे नुकसान

Mobile phone side effect : जास्त फोन वापरल्याचे नुकसान
Mobile phone side effect:आजच्या काळात स्मार्टफोन ही एक अशी गोष्ट आहे. ज्याच्याशिवाय आपण ...

Independent Day 2022 Essay स्वातंत्र्य दिन 2022 वर निबंध

Independent Day 2022 Essay स्वातंत्र्य दिन 2022 वर निबंध
भारताच्या राष्ट्रीय सणांपैकी एक म्हणजे आपला स्वातंत्र्यदिन, ज्या दिवशी भारत स्वतंत्र ...