शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मे 2022 (21:51 IST)

Home Remedies : कोरफड (एलोविरा)चे औषधी उपयोग

Aloe Vera
रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्‍तस्राव होत असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते.
 
दाढी करताना प्रथम हा गर गालांना व गळ्याला एक इंचाचा कोरफडीचा तुकडा घेऊन तो चोपडावा. कोरफडीचा उरलेला तुकडा घेऊन 
 
फ्रीजमध्ये ठेवावा व नियमितपणे वापरावा. दाढीपूर्वीचे लोशन दाढीनंतरचे लोशन असे काहीच या प्रकाराने दाढी केल्यास लावावे लागत नाही. दाढी केल्यानंतर चेहरा अगदी उजळ होऊन स्वच्छ होतो.
 
पानांचा गर किंवा त्यामधून निघणारा पिवळसर रस भाजलेल्या त्वचेवर, हिमदाहावर तसेच त्वचेच्या अन्य तक्रारींवर प्रभावी आहे, चेहर्‍याच्या सौदर्यप्रसाधनांत, तसेच केस धुण्याच्या शँपूमध्ये कोरफडीच्या गराचा वापर करतात.
Aloe vera
Aloe vera
कोरफडीचा गर रोज सेवन करण्याचे; तसेच बाहेरून लावण्याचे अनेक फायदे आहेत.
 
यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यास भूक चांगली लागते व शौचास साफ होण्यासही मदत मिळते.
 
कोरफडीचा ताजा गर न्हाण्यापूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते; तसेच कंडिशनिंग होते. त्वचेवरही कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ व सतेज राहण्यास मदत मिळते.
 
संगणकावर वा इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले वा डोळ्यांची आग होऊ लागली, तर कोरफडीच्या गराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते. चकती ठेवणे अवघड वाटले, तर गराची पुरचुंडी करून डोळ्यांवर वारंवार फिरविण्याने बरे वाटते.