मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

‘जायफळा’चे विविध उपयोग…

जायफळ चहा, कॉफी, दुधात व मिठाईत स्वादासाठी वापरतात हे सर्वश्रुत आहे; पण याचा औषधीतदेखील मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. मोठे वजनदार, टणक जायफळ उत्तम प्रतीचे असते. जायफळ अनेक वर्षे तुपात ठेवले असता खराब होत नाही. जायफळापासून तेल निघते. या स्थिर तेलास ‘जातिफळ-नवनीत’म्हणतात. 
 
जायफळ कफवातशामक, शोथहर, वेदनास्थापन, उत्तेजक, कुष्ठघ्न, दुर्गंधीनाशक व वातशामक आहे.
जायपत्रीपासून बनविलेल्या तेलात “जावंत्रिका तेल’ (बांडा साबू) म्हणतात. बाजारात याच्या साबणासारख्या वड्या मिळतात.
झोपताना तुपात उगाळलेल्या जायफळाचा लेप मस्तकावर करण्याने शांत झोप लागते.
डोकेदुखीत दुधात उगाळून मस्तकावर लेप करावा.
पोटदुखी, मोडशी, जुलाबात भाजलेल्या जायफळाची पूड, दूध वा पाण्यातून कैफ येईल इतक्‍याच प्रमाणात घ्यावी. 
डोकेदुखी तसेच बाळंतपणातील कंबरदुखीत पाण्यात अगर दारूत उगाळून लेप करतात.
तुपात उगाळलेल्या 1 ग्रॅम जायफळाचे लेपात 2 थेंब मध व 2 चिमटी खडीसाखरपूड घालून दिवसातून तीन वेळा घेण्याने पांढरी आव, अतिसारास आराम पडतो.
जायफळ भाजून तितकाच गूळ घालून 1/1 ग्रॅमच्या गोळ्या बनवून दर 10 मिनिटांनी 1/1 गोळी जुलाब थांबेपर्यंत घेत जावी. फार लवकर आराम पडतो.
जायफळ तांदळाच्या धुवणात उगाळून घेण्याने उचकी थांबते.
राईच्या तेलात जायफळाचे तेल मिसळून मालीश करण्याने बरेच दिवसाचे जखडलेले सांधे मोकळे होतात.
कामोत्तेजना, स्तम्भन, रजोरोध आदी विकारात हितकर. 
अतिसारात जायफळ उगाळून बेंबीवर लेप करतात.
चर्मरोगावर जखम लवकर सुकण्यासाठी पाण्यात उगाळून लेप करावा.
पाव जायफळाचे चूर्ण कोमट पाण्यातून घेण्याने चांगली झोप लागते.
व्रण भरून येण्यासाठी वस्त्रगाळ चूर्णांचे तिळाचे तेलात खलून केलेले मलम वापरतात. 
कापसाच्या बोळ्यात पूड घालून दाताखाली धरण्याने दातातील कीड मरते व ठणका थांबतो.
मोठ्या प्रमाणावर घेणे मादक असते