शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: सोमवार, 6 मे 2019 (14:31 IST)

केसांच्या सर्व आजारांवर मात करणारा बटाटा..

बर्‍याच वेळा अस होत की जास्त केमिकल आणि शॅम्पूचा वापर केल्याने केसांचे बरेच आजार होण्याची शक्यता असते. जास्तकरून महिलांचे कोरडे केस, कोंडा आणि केसांची ग्रोथ थांबल्या सारखे वाटते. महागडे केमिकल युक्‍त हेयर प्रॉडक्ट सोडून तुम्ही नॅचरल उपायांच्या मदतीने केसांच्या सर्व समस्येला दूर करू शकता. बटाटा एक अशी वस्तू आहे ज्याचे सेवन केल्याने तुम्ही केसांच्या सर्व त्रासांपासून मुक्त होऊ शकता. 
 
तुम्ही बटाट्यात मध, दही आणि लिंबाचा रस मिसळून तुमच्या केसांशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता. 
 
1. दाट आणि सॉफ्ट केसांसाठी
दोन ते तीन बटाटे घ्या, याला सोलून याचे पेस्ट तयार करा. यानंतर या पेस्टमध्ये अंड्याचा पिवळा भाग आणि मध मिसळा. त्यानंतर या पेस्टला केसांवर लावा. याला काही वेळ वाळू द्या. जेव्हा हा पॅक वाळून जाईल तेव्हा चांगल्या माइल्ड शँपूने केस धुऊन घ्या. दोन ते तीन वेळा याचा वापर केल्याने तुम्हाला केसांमध्ये फरक दिसू लागेल.
 
2. लांब केसांसाठी
दोन बटाटे घ्या आणि याचा रस काढा. यात दोन चमचे एलोवेरा जेल मिसळा. या मिश्रणाला केसांच्या मुळांना लावा. याला 30 ते 40 मिनिटापर्यंत केसांमध्ये राहू द्या. यानंतर पाण्याने केस धुऊन घ्या. लगेचच शँपू लावायची गरज नसते. 
 
3. कोंडा असलेल्या केसांसाठी
एक किंवा दोन बटाटे घेऊन त्यांचा रस काढून घ्या. या रसात लिंबू आणि दही मिसळून त्या पेस्टला केसांना लावून थोड्यावेळेसाठी राहू द्या. नंतर एखाद्या चांगल्या शँपूने केस धुऊन घ्या.