पोटविकारावर गुणकारी ताक
|
भूक न लागणे, पोटात जोरात कळ निघणे आदी लक्षणेही जाणवतात. गोड व आम्ल पदार्थांचे जास्त सेवन करणे, भूक न लागता जेवण करणे, शारीरिक श्रम न करणे यामुळे पोटाचे विकार वाढत असतात.
पोटाच्या व्याधीपासून आराम मिळावा म्हणून आपण लगेच मेडिकलमधून औषधे आणून खात असतो. ओषधांचा तात्पुरता आराम पडतो. परंतु, काही वेळानंतर जैसे थे स्थिती होते. आयुर्वेदात ताकाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. दिवसातून तीन ते चार वेळा भाजलेलं जीरं, थोडे मीठ व बारीक केलेले मिरे टाकून ताक प्याल्याने एका आठवड्यात पोटविकारापासून कायमचा आराम पडतो.
पोटाचे विकार सुरू असताना आजारी व्यक्तीने पाचनक्रियेत अडथळा निर्माण होईल असा कुठलाच पदार्थ खाऊ नये. गोड पदार्थ तर वर्ज्य करावेत. अपचन व अजीर्ण झाल्यावर ताक हेच एकमेव औषध असून ते नियमित घेतल्याने पोट साफ होते. बहुतेक घरात जेवणानंतर ताक घेतले जाते.
