फिट्स आल्यास घाबरू नये
|
फिट्स दोन मिनिटापेक्षा जास्त वेळाची नसते. ती केव्हाही व कोणत्याही वयाच्या व्यक्तीला येऊ शकते. अचानक आपल्याला चक्कर येऊन आपण जमिनीवर पडतो व शुध्द हरपतो. फिट्स आल्यानंतर आपल्या हातापायात कंप निर्माण होतात. तोंडातून फेस येतो. वारंवार फिट्स येत असेल तर आपल्याला खालील टिप्स उपयोगी पडू शकतात.
* अक्कलकाढा 100 ग्रॅम, व लिंबू सत्त 100 ग्रॅम यांचे मिश्रण मधमध्ये एकजीव करून 5 ग्रॅम प्रतिदिन सकाळी काहीही न खाण्यापूर्वी चाखल्याने फिट्स कायमचा दूर होतो.
* सालवटीचे चूर्ण एक ग्रॅम प्रतिदिन मधासोबत चाखावे. त्यानंतर दूध प्यावे. असे नियमित केल्याने जुनाट फिट्स दूर होतात.
* शुध्द हरपलेल्या व्यक्तीला लसूण कुटून वास दिल्यास तो शुध्दीवर येतो.
* रोज 3-5 लसणाच्या पाकल्या दुधात टाकून ते प्यायल्याने फिट्स येत नाहीत.

