सौंदर्य उपचार
चेहऱ्यावर डाग, सुरकुत्या
1.
चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या मुळे डाग पडल्यास बटाटे उकडून थंड करावे आणि सालासकट वाटून घ्यावेत. त्या काकडीचा रस टाकून थोडा सा लिंबाचा रस मिसळावा या मिश्रणाने चेहऱ्यावर लेप करावा. तासा भराने धुऊन टाकावा काही दिवस प्रयोग केल्याने डाग नाहीसे होतील. 2.
चेहऱ्यावर ची काळसर झाक दूर करण्यासाठी एक चमचा व्हिनीगर मध्ये अंड्याचा पांढरा बलक आणि पिकलेले केळे चांगल्याप्रकारे मिसळावे या पेस्टला चेहऱ्यावर 15 मिनिटं लावून ठेवावे नंतर कोमट पाण्याने धुऊन टाकावे. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग करावा. 3.
पिकलेले पपईचा तुकडा कापून चेहऱ्यावर रगडावा. दहा मिनिटांनी चेहरा धुऊन टाकावा. थोड्याच दिवसात चेहरा उजळून चेहऱ्यावरचे डाग, सुरकुत्या इत्यादी नाहीश्या होतील.