पूर्ण नाव: मार्टीन डेविड क्रो जन्म: 22 सप्टेंबर, 1962, हेंडरसन ऑकलंड मुख्य संघ: न्यूलंड, ऑकलंड, सेंट्रल डिस्ट्रिक्ट, सोमारसेट, वेलिंगटन शैली: उजव्या हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज अन्य: प्रशिक्षक, समालोचक
विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार मार्टिन क्रोला 1985 मध्ये मिळाला होता. मार्टीनला शास्त्रीय शैलीचा क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाते. त्याचे लांबच लांब ठोकलेले फटके आजही क्रिकेट शौकीनांना आठवतात. क्रोचे लहानपण क्रिकेटच्या वातावरणातच गेले. त्यांचे वडील आणि भाऊ क्रिकेटपटू होते. वडीलांनी प्रथम श्रेणीचे अनेक सामने खेळले, त्याचा भाऊ जेफ न्यूझीलंडच्या संघात खेळाडू होता.
एकोणीस वर्षाचा असतानाच मार्टीनने कसोटी क्रिकेटला सुरवात केली होती. त्यावेळी त्यांना जगातील सर्वांत कमी वयाचा खेळाडू म्हणून गौरविण्यात आले होते. क्रो आपले सर्वस्व क्रिकेटला अर्पण केले होते. जखमी झाला तरीही मैदानावर टिकून राहणे हे त्याचे वैशिष्ट्य. दुखापतीच्या काळात त्यांनी अनेक विश्वविक्रम मोडले आहेत.
आपल्या समकालीन रिचर्ड हॅडलीबरोबर 1980 च्या दशकात क्रो न्यूझीलंड संघाचा कणा होते. त्यांनी 1984 मध्ये सॉमरेसेट सत्राच्या दरम्यान न्यूझीलंड संघाला उल्लेखनीय यश मिळवून दिले होते. 1987 नंतर त्यांना न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद सोपविण्याचा प्रस्ताव होता. पण यावर विव्ह रिचर्ड्स, जोएल गार्नर आणि इयान बोथम या जगातील महान खेळाडूंसह संघातील अन्य खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. मीडियानेही क्रोबद्दल नकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्यावर टीका केली.
हॅडली बाद झाल्यानंतर क्रोवर निवृत्तीसाठी दबाव आला होता. पण 1994 मध्ये त्यांनी आपला फॉर्म दाखवून देत इंग्लंडविरूद्धच्या तीन कसोटी सामन्यात 380 धावा केल्या. त्यानंतर दीड वर्षापर्यंत ते क्रिकेट खेळले. पण त्यांचे शरीर साथ देत नव्हते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावरही ते समालोचकाच्या रूपात क्रिकेटशी संलग्न राहिले.