रंगपंचमीची रसोई
रूसावं तुच आणि हसावं तुच
होळीच्या रंगात भिजवावं सुद्धा तूच
रंग उधळावा फक्त तो हृदयावर
या होळीचा रंग, फक्त तुझ्या गालावर!
रंगविण्यासाठी तुला जवळ असणं अपेक्षित नाही,
तुला फुलविण्यासाठी
रंग असणं गरजेचं नाही!
तू रंगाची
तू ढंगाची
होळी आपली
बीना रंगाची!
रंगाने भिजल्यापेक्षा
तू मनाने भिजावी,
प्रत्येक ऋतूत
तू सदा फुलावी!
भांग भरतांना दिसली की,
रंगपंचमीची आठवण येते,
माळलेल्या गजर्यात मुक्या
पळसाची आठवण होते!
गजानान डोईफोडे