गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017 (11:59 IST)

रूप पाहता लोचनी

'रूप पाहता लोचनी'
आपण बालपणापासून देवीची विविध रूपे पदोपदी पाहत आलोय.
 
पहिली माळ - 'मातृदेवतेची'.
जी आपल्यासाठी कष्ट उपसताना दिवस-रात्र, आजारपण, थकवा, तहान-भूक कशाचीही पर्वा करत नाही.
आपल्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करणे सोडत नाही.
मातृदेवते, तुला शतशः प्रणाम !
 
दुसरी माळ - 'आजी' नामक 'मायेच्या सागराला'.
जिच्याजवळ आपल्या दुधावरच्या सायीसाठी प्रेम, माया, ममता, आशीर्वाद यांचा जादूचा खजिनाच दडलेला असतो.
 
तिसरी माळ - 'माय मरो, मावशी जगो' या उक्तीला जी जागते त्या 'मावशीची'.
आईच्या बरोबरीने आपल्यावर मायेची पाखरण घालणारे कोणीतरी या जगात आहे याची जाण देणारी.
 
चौथी माळ - लहानपणी आपल्याला कडेवर घेऊन फिरवते त्या 'आत्याची'.
वडील रागावल्यावर पाठीशी घालून पदराने डोळे पुसणारी...
...प्रेमळ, लाघवी आत्या.
 
पाचवी माळ - मायेच्या 'बहिणीची'.
लहान असो वा मोठी,
आपली सुख-दुःखं वाटून घेणारी,
गुपिते पोटात लपविणारी.
 
सहावी माळ - लग्नानंतर मिळालेल्या मैत्रिणीची... 'नणंदेची'.
आपल्याला आलेल्या छोट्या-मोठ्या अडचणींचे निवारण करणारी.
लग्नानंतर नवीन घरात नवखेपणा जाणवू न देता,
अलगद बहिणीची माया देणारी.
 
सातवी माळ - 'अहों'च्या मातृदेवतेची... 'सासुबाईंची'.
सासरच्या पद्धती, रिती-रिवाज, आवडी-निवडी शिकविणारी.
ते सारं अंगवळणी पडेपर्य॔त सांभाळून घेणारी.
 
आठवी माळ - जीवाला जीव देणाऱ्या  जिवलग 'सखीची'.
आपले रुसवे-फुगवे सहन करणारी.
आपल्या यशात स्वतःचे यश मानणारी.
चांगल्या-वाईट सवयींकडे दुर्लक्ष करून खरी मैत्री जोपासणारी.
गोड गुपिते सांभाळणारी,
सडेतोडपणे खरे सल्ले देऊन सावरून घेणारी.
 
नववी माळ - आपल्या लाडक्या  'लेकीची'.
जिच्या जन्मामुळे झालेल्या आपल्या मातृत्वाच्या सार्थकतेची.
आपल्यावर रागावणारी, रुसणारी...
पण वेळप्रसंगी,
कधी आपली आई,
तर कधी मैत्रीण होऊन
आपल्याला समजून घेणारी.
जगातल्या कोणत्याही गोष्टींपेक्षा प्राणप्रिय असणारी...
'आपला अमूल्य ठेवा, आपला श्वास, आपलीच छोटी बाहुली'.
 
शेवटचा 'दसरा' -
'जो कामवाल्या बाईबरोबर होतो हसरा'.
आपला उजवा हातच जणू.
जिच्या न येण्याने वेळापत्रक कोलमडतं.
वेळप्रसंगी 'ताई तुम्ही थकलात, मी करते, बसा तुम्ही',
असं म्हणून आपला क्षीण घालविणारी.
 
- रोजच्या जीवनातील देवींची ही वेगवेगळी रूपे.
- त्यांना 'शतशः नमन' !