शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

4 पुणेरी जोक्स बॅक टू बॅक

1. पुण्यातल्या एका फ्री वायफाय नेटवर्कचा पासवर्ड, “घे भिकारड्या”
 
 
2. भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना
पुणेकर : १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी : हा आहे साहेब
पुणेकर : आधी ते खर्च कर

3. पुण्यातील एक खवचट म्हातारा एकदा दातांच्या डॉक्टरांकडे गेला. त्या खुर्चीत बसल्यावर डॉक्टरांनी त्यांना मोठा आ आ आ करायला सांगितले. कितीही मोठा केला तरी ते आजून मोठा करायला सांगायचे.
म्हातारा म्हणाला, “तोंडात बसून काढणार असाल तर ती पायातली चप्पल आधी काढा”
 
4. पुणेकर : काका पावशेर रताळे द्या
दुकानदार : पिशवीत देऊ?
पुणेकर : नाही नाही… पेन ड्राईव्ह आणलाय. त्यात “रताळे” नावाचा फोल्डर बनवा आणि टाका त्यात.