मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पुणेरी संक्रांत

puneri jokes
पुणेरी संक्रांत
 
तिळगूळ देण्याचे Timing सकाळी ९ ते १, 
संध्याकाळी ४ ते ८
तिळगूळ दिल्यावरच गोड बोलले जाईल !!!! 
पण हा नियम नाही, अपमान पण होऊ शकतो !!!
दुपारी १ ते ४ तिळगूळ स्वीकारला जाणार नाही !!!! 
तसेच दुपारी १ ते ४ गोड बोलले जाणार नाही !!!! 
मोठी वडी दिल्यास छोटी वडी परत मिळेल !!!
छोटी वडी दिल्यास हलवा मिळेल !!!!
हलवा दिल्यास परत काही मिळणार नाही !!!!
हलवा रंगीत Mix कलर चा मिळेल !!!! 
उगाच रंगीत दाणे वेचून घेऊ नयेत !!!! 
हलव्याला किती काटे आहेत हे बघत थांबू नये !!!!
वडीचा आकार व रंग याबद्दल काहीही Comment करू नये !!!! 
वडी शांतपणे घरी घेऊन जावी आणि मग खावी !!!! 
वरील कोणत्याही गोष्टीसंदर्भात शंका असल्यास तिळगूळ देऊ नये. आपापल्या घरी खावा !!!