सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जून 2017 (14:58 IST)

Whats App Message : मानसिक अवस्था बिघडलीय...

गरम कढईतल्या मोहरी पेक्षा
माणसं तडतड करत आहेत 
काय झालंय कळत नाही 
फारच चीड चीड करत आहेत....
 
नातेवाईक असो , मित्र असो 
भयंकर स्पर्धा वाढलीय 
तेंव्हा पासूनच माणसाची 
मानसिक अवस्था बिघडलीय...
 
कुणी कुणाला काहीच विचारीन 
मनानचं कसंही वागायलेत 
आजूबाजूच्या लोकांकडून 
जास्तच अपेक्षा ठेवायलेत....
 
कमाई किती खर्च किती 
काहीच कुठे मेळ नाही 
भेटायला जाणं , गप्पा मारणं 
आता कुणालाच वेळ नाही...
 
कॅपॅसिटी नसतांनाही 
खरेदी उगीच करायलेत
सॅलरी व्हायलीय कमी 
अन हप्तेच जास्त भरायलेत...
 
शेजा-यानी स्कूटर घेतली 
की हा  घेतो मोटर 
दूध बॅग आणायला सांगितली की 
मोजीत बसतो चिल्लर....
 
अरे , अंगापेक्षा बोंगा
कशाला वाढवून बसतो 
पगार जरी झाला तरी
उदास भकास दिसतो....
 
पर्सनल लोन, गोल्ड लोन
जे भेटल ते घ्यायलेत 
दिलेले पैसे मागितले तरी 
गचांडीलाच धरायलेत....
 
सहनशीलता आणि  संयम 
कुठे चालला कळत नाही 
पॅकेज भरपूर मिळायलंय पण
समाधान काही  मिळत नाही....
 
घरी काय दारी काय 
नुसत्या किरकीरी वाढल्यात 
नवऱ्याला न सांगताच 
बायकांनी भिश्या काढल्यात....
 
कितीही साड्या कितीही पर्स 
शर्ट , पँटी ला गणतीच नाही 
तरीही कुरकुर चालूच असती 
धड साडी तर कोणतीच नाही.....
 
मग काय ! नवऱ्यानं म्हणावं 
तुला अक्कल नाही 
बायकोनं म्हणावं 
तुम्हालाच काही कळणं नाही....
 
दोन दोन दिवस अबोला 
कशाऊनहीं भांडणं व्हायलेत 
लग्न झालं की पोरं पोरी 
वर्षातच घटस्फोट घ्यायलेत....
 
पत्नी पीडित नवरयांच्याही 
संघटना निघत आहेत 
डोळे मोठे करून पोट्टे
बापाकडेच बघत आहेत.....
 
दिवेलागण , शुंभकरोती 
" स्वस्थ होऊ द्या " गायब झालं 
शक्य असेल याच्यामुळेच 
माणसां-माणसात वितुष्ट आलं...
 
चित्त थोडं शांत ठेऊन 
जुनी पाने चाळावी लागतील 
यदाकदाचित पुन्हा माणसं 
एकमेकाशी प्रेमाने वागतील....