Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप तो बापच आसतो

Updated: बुधवार, 4 ऑक्टोबर 2017 (11:48 IST)
 
आत गेल्यावर दोन्ही बाजूला सुंदर फुलझाडं लावली होती. बागकाम करणाऱ्या माणसानं बागेतील नळ उघडाच ठेवला होता. पाणी वाहत होतं आणि तो कर्मचारी कुठं दिसत नव्हता.
 
याने वाहणारा नळ बंद केला आणि पाईप व्यवस्थित करून ठेवली. स्वागत कक्षात पण कुणीच दिसत नव्हतं. 
"पहिल्या मजल्यावर मुलाखती होतील" असं सूचना फलकावर लिहिलं होतं.
 
तो हळूच जिना चढू लागला.
 
काल रात्री लावलेले जिन्यातले दिवे सकाळी १० वाजून गेले तरी तसेच होते.
 
त्याला वडिलांचे शब्द आठवले "पंखे, लाईट बंद न करता घरातून का निघून जाता?"
 
आणि त्याला वडिलांच्या त्या वाक्याचा त्रास झाला. त्या विचारातच त्याने दिवे बंद केले.
 
वर गेल्यावर त्याला अनेक उमेदवार मुलाखतीची वाट पहात बसलेले दिसले. बसलेल्या उमेदवारांची संख्या पाहून आपल्याला ही नोकरी मिळेल का याचा तो विचार करू लागला.
 
त्याने भीतीयुक्त उत्सुकतेने हॉलमध्ये प्रवेश केला. दरवाजाजवळ "सुस्वागतम" लिहिलेली चटई होती. त्याच्या लक्षात आले की ती चटई     दुमडली होती. कुणाच्या तरी पायात अडकायची शक्यता होती. त्याने चिडूनच ती चटई सरळ केली. 
 
त्याने पाहिले की समोरच्या काही खुर्च्यांच्या ओळींमध्ये त्यांच्या बोलावण्याच्या प्रतीक्षेत अनेक लोक बसले होते, तर मागील काही ओळी रिक्त होत्या, परंतु त्या ओळींवरचे अनेक पंखे विनाकारण चालू होते.
 
त्याने पुन्हा आपल्या वडिलांची वाणी ऐकली, "पंखे, लाईट बंद न करता घरातून का निघून जाता?" त्या तिडिकी सरशी त्यांने गरज नसलेले पंखे बंद केले आणि रिकाम्या खुर्च्या एकावर एक ठेवल्या.
 
अनेक उमेदवार मुलाखत खोलीत प्रवेश करून लगेच दुसर्ऱ्या दरवाजातून बाहेर पडतांना दिसत होते. त्यामुळे मुलाखतीत काय प्रश्न विचारतात याचा अंदाज कुणाकडूनही मिळत नव्हता. 
 
तो आत गेला आणि न घाबरता मुलाखती साठी उभा राहिला.
 
मुलाखत घेणाऱ्या ऑफिसरने त्याच्याकडून प्रमाणपत्रे घेतली आणि त्याला कुठलाही प्रश्न न विचारता विचारले, "तुम्ही कामावर कधी हजर होऊ शकता?" 
 
त्यांला समजेना की, "हा मुलाखतीत विचारायचा एक ट्रिकी प्रश्न आहे, किंवा हा एक संकेत आहे की मला नोकरीची ऑफर दिली गेली?" तो गोंधळून गेला. 
"आपण काय विचार करीत आहात?" बॉसने विचारले. "आम्ही येथे कोणालाही प्रश्न विचारत नाही. काही प्रश्न विचारून आम्ही कोणाच्याहीच्या कौशल्यांचे मूल्यांकन करू शकणार नाही. म्हणून आम्ही चाचणी घेऊन व्यक्तीच्या वृत्तीचे मूल्यांकन करत आहोत.  आम्ही उमेदवारांच्या वर्तणुकीवर आधारित काही चाचण्या ठेवल्या आणि आम्ही सर्वांवर सीसीटीव्ही द्वारे नजर ठेवली.  
 
"आज आलेल्या कोणत्याही व्यक्तीने रबरी नळी, स्वागत चटई, निरुपयोगी चालणारे पंखे किंवा दिवे नीट केले नाहीत.
 
आपण असे फक्त एकच उमेदवार होता ज्यांनी ते केले. म्हणूनच आम्ही तुम्हाला नोकरीसाठी निवडण्याचा निर्णय घेतला आहे", बॉस म्हणाले. 
 
आपल्या वडिलांच्या शिस्त व सुचनांवरून त्याची नेहमीच चिडचिड होत असे. आता त्याला असे जाणवले की त्याला फक्त त्याच शिस्तीमुळे काम मिळाले आहे. या प्रसंगामुळे त्याच्या वडिलांवरची त्याची चिडचिड आणि संताप पूर्णपणे विसर्जित झाला.
 
त्याने रोज आपल्या वडिलांच्या सूचना आणि मूल्ये कामाच्या ठिकाणी पाळायचे ठरवले आणि सुखाने परत आपल्या घरी जायला निघाला.
 
आपले वडील जे काही सांगतात ते केवळ आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे!
 
दगड आपोआप एक सुंदर शिल्पकला बनू शकत नाही तर त्याला झालेल्या छन्नीच्या घावांच्या वेदना त्याला शिल्प बनवतात. 
 
आपण एक सुंदर व्यक्तिमत्व आणि चांगला मनुष्य बनण्यासाठी आपल्याला स्वतःच्या वाईट सवयी सोडून देणे आणि वागणुकीत चांगला बदल घडवण्याची आवश्यकता आहे. तेच आपले वडील करतात जेव्हा ते आम्हाला शिस्त लावतात.
 
आई बाळाला भरवण्यासाठी तिच्या मांडीवर बाळाला उचलून घेते  आणि खाऊ पिऊ झाल्यावर तिला झोपवते. पण वडीलांचं तसं नसतं.  ते बाळाला आपल्या खांद्यावर घेऊन ते जग दाखवतात जे ते पाहु शकत नाहीत.

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

शुगर डॅडी' वादावरून गोविंदाच्या पत्नीच्या समर्थनार्थ पुढे येत काश्मिरा शाहने केले विधान

गंभीर दुखापत झाल्यामुळे गौरव खन्ना 'खतरों के खिलाडी'मधून बाहेर पडला

रक्षाबंधन विशेष सुट्टीच्या काळात फिरायला जायचे का? कमी खर्चात सहलीसाठी ही ठिकाणे सर्वोत्तम

अक्षय कुमार १३ वर्षांनंतर विपुल शाहसोबत 'समूक'मध्ये आतापर्यंतच्या सर्वात अनोख्या अवतारात परतत आहे

राष्ट्रगीत गाताना अडखळल्यामुळे हिना खान ट्रोल झाली

पुढील लेख
Show comments