बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 12 जून 2018 (10:39 IST)

" या आईपणाला एक बटन हवं होतं "

" या आईपणाला एक बटन हवं होतं ...
मायेचं बटन सहज ..
ऑन ऑफ
तरी करता आलं असतं ..
:
काळजीचं व्हॉल्युम ..
कमी करता आला असता ..
सतत शंकांचं बटन ..
म्युट करता आलं असतं ..
:
या आईपणाला एक बटन हवं होतं ...
किती दूरवर पोहोचते ...
या आईपणाची रेंज ...
:
मुलांच्या विचारा शिवाय ..
दुसरा नसतो चेंज ..
:
सेटिंग मध्ये जाउन जरा ..
वाय फाय ..
ऑन ऑफ करता ..
आलं असतं ..
:
अगदीच नॉट रिचेबल वाटलं,
तर आज नेट वर्क नाही ..
म्हणून गप्प बसता आलं असतं ..
:
या आईपणाला एक बटन हवं होतं ..
मूड मध्ये असली ..
कि " आई ग माझी " म्हणत ..
भरभरून बोलतात मुलं,
ऑडिओ विडीओ रेकोर्डिंग ..
तरी करता आलं असतं ..
:
या आईपणाला एक बटन हवं होतं ...