Marathi Biodata Maker

..जे निरभ्र असते ते आकाश.. आणि..

गुरूवार, 15 नोव्हेंबर 2018 (00:05 IST)
काय पण गंमत आहे बोलण्यात , 
आपण "शब्द" किती पटकन बदलतो,
कशालाही नावं देताना आपण त्यांच्या
"स्थाना"वरून निश्चित ठरवतो.
 
नितळ रस्त्यावरच्या खराब भागाला
"खड्डा" म्हणून हिणवतो.......
तर नितळ गालावरच्या छोट्या खड्ड्याला
"खळी" म्हणून खुलवतो.......
 
भिंतीवर पडलेल्या काळ्या ठिपक्याला
"डाग" म्हणून डावलतो.......
तर चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागाला
"तीळ" म्हणून गोंजारतो.......
 
तुटुन पडलेल्या केसांच्या पुंजीला
"जटा" म्हणून हेटाळतो.......
तर चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या जोडीला
"बटा" म्हणून सरकवतो.......
 
असच असतं आयुष्यात आपल्याही
"सोबती"नेच आपण तसे घडतो.......
 
चुकीच्या सोबतीने माणूस बहकतो
"योग्य" सोबतीनेच अधिक बहरतो......

 एकदा प्रविण दवणेंनी शांताबाई शेळके यांना विचारले की तुम्ही तुमच्या एका कवितेत आकाश आणि आभाळ असे दोन शब्द वापरलेयत... दोन्हींचाही अर्थ पहायला गेला तर एकच आहे... मग असे दोन वेगळे शब्द का ..?
     शांताबाईंनी किती सुंदर उत्तर दिले पहा.. त्या म्हणाल्या..
 
...चुकतोयस तू प्रविण...
  ..जे निरभ्र असते ते आकाश..
आणि..
  ..जे भरून येते ते आभाळ..!!
   
..आणि म्हणुनच् त्या निसर्गाच्या... त्या भगवंताच्या असिम क्रुपेला, त्याच्या मायेला आकाशमाया नाही तर आभाऴमाया म्हणतात ..!! 
अशीच आभाळमाया तूम्हा सर्वा मध्ये राहू देत.

सर्व पहा

अदा शर्मा 'गजरा' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज

Ramayana Scene Leaked रणबीरच्या 'रामायण'मधील ११ सेकंदांची क्लिप लीक! यूजर्स नाराज

आशुतोष राणा यांनी भक्तांना महत्त्वपूर्ण भेट दिली; आता घरबसल्या १०० मंदिरांचे दर्शन घडणार

कंगना रणौत 'लॉक अप २' मध्ये लोकांचा आवाज म्हणून शोमध्ये प्रवेश करणार

Subodh Bhave in Queen 2 सुबोध भावे 'Queen 2' मध्ये कंगना रणौतच्या पतीच्या भूमिकेत

सर्व पहा

Endometriosis एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय? सुमोना चक्रवर्तीला शस्त्रक्रिया का करावी लागली, जाणून घ्या

'गायीच्या मूत्रासारखे सूप देत आहेत'; लॉक अप मध्ये गोविंदाची पत्नी सुनीता ढसाढसा रडली

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या 'सुलतान'ला १० वर्षे पूर्ण

प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांत 'सतलुज' ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला

बॉलिवूड अभिनेते आमिर खान यांनी पुन्हा एकदा नवीन आयुष्याला सुरुवात केली

पुढील लेख
Show comments