Dharma Sangrah
✕

"असं काय बघताय ?

Updated: बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (16:55 IST)
 
"तुमचं उगाच काही तरी"
म्हटलं..पण सुखावली मनात...
त्यानं दुखावली कित्येकदा 
पण विसरली सारं क्षणात!
 
"आज स्वारी अशी फार्मात 
असं काय झालं ?
काय घेऊन बसलात 
माझं कौतुक मेलं !"
 
"राबराब राबलो 
अन् फाइल पूर्ण केलं 
एका चुकीचं निमित्त अन् 
बॉसनं नको तेवढं झापलं"
 
पुरुष असलो तरी 
डोळे आज पाणावले 
"हिचंही असंच होत असेल"
ह्रुदय आतून हेलावले !
 
सारंच आवरुन कशी तू 
हसून स्वागत करतेस ?
कौतुकाची थाप नाहीच 
पण राग मात्र झेलतेस
 
आज मला शब्द दे,
असं सोसणं तू बंद कर 
चुकलो मी कुठं तर 
दाखवून देणं सुरू कर
 
तुझ्या गप्प राहण्यानं 
सारे गृहित तुला धरतात 
बाहेरचा राग वैताग 
फक्त तुझ्यावर काढतात"
 
पापण्यांच्या कडा पुसत 
ती हळूच बोलली,
"बाकी सगळं जाऊ दे,
गंगेला मिळू दे 
अशीच कौतुक थाप 
फक्त अधूनमधून मिळू दे!"
 

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

बिगबॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतमच्या कॅफेमध्ये चोरी

सिद्धार्थ-कियारा पुन्हा आई-बाबा होणार

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

सर्व पहा

'हनुमान अंश'च्या यशानंतर 'मचन बाबा' मोठ्या पडद्यावर येत आहे

नाना पाटेकरांचा मृत्यू कशामुळे झाला? पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला

एकता कपूरने 'द डर्टी पिक्चर २' ची घोषणा केली; १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा एक बोल्ड कथा पडद्यावर दिसणार

जेष्ठ मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन

माँ दुर्गेची अमर गाथा मोठ्या पडद्यावर, 150 हून अधिक कलाकार बनवत आहे हॅन्ड ड्रॉन ऍनिमेशन चित्रपट 'महादेवी आदिशक्ती'

पुढील लेख
Show comments