अहो तो तोंडावर चा मास्क काढा आधी....  
					
										
                                       
                  
                  				  काल रात्री थोडावेळ वीज गेली होती म्हणून मेणबत्ती लावली होती.
	वीज आल्यावर मेणबत्ती विझवायला मी बऱ्याच वेळा फुंकर घातली. जोर लावून पण मेणबत्ती विझायला तय्यारच नव्हती.
				  													
						
																							
									  
	आता मात्र माझी टरकली 
	च्यामारी काय माझी ऑक्सिजन लेव्हल तर खाली नाही ना आली? अहो घाम फुटला अक्षरशः.
				  				  
	मग बायको हळूच माझ्या कानात कुजबुज ली.
	अहो तो तोंडावर चा मास्क काढा आधी.