शनिवार, 4 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

गाढव तंबाखू खात नाही

गाढव तंबाखू खात नाही
बिरबलास तंबाखू खायची सवय होती. मात्र, बादशहा अकबरास ती सवय अजिबात नव्हती. एकदा बादशाह अकबर आणि बिरबल तंबाखूच्या शेताजवळून जात होते. शेतात एक गाढव गवत खाताना बघून अकबर बिरबलास म्हणाले- ‘बघ बिरबल, तंबाखू किती वाईट असते, हे गाढवदेखील तंबाखूला स्पर्श करीत नाही.’
तसा हजारजबाबी बिरबल लगेच उत्तरला-‘ होय महाराज, गाढव तंबाखू कधीच खात नाही.