बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2016 (16:56 IST)

जग कसं अजब आहे..

देवावर प्रेम सर्वांनाच आहे.
पण ' त्याच्या घरी ' जायची घाई मात्र कुणालाच नाही.
आपल्या घरात सर्वांनाच देव हवा.
पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते.
देव आपल्या घरी आला,म्हणजे सण,उत्सव आणि आनंद.
आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे दुःख,शोक..
देव आपल्या घरी यावा,म्हणून आटापिटा.
आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा..
देवाघरून येणं,म्हणजे जन्म..
देवाघरी जाणं म्हणजे मृत्यू. दोन्ही अटळ आहे.पण ह्या मधली जी गम्मत आहे,
त्यालाच 'आयुष्य ' म्हणतात.
 
व. पु. काळे